फसवणूक प्रकरणातील महिलेस अटक
By Admin | Updated: October 21, 2014 23:42 IST2014-10-21T21:17:41+5:302014-10-21T23:42:10+5:30
कमी किमतीत शिलाई मशीन घेऊन बाहेर दुप्पट किमतीने विकण्याचे आमिष

फसवणूक प्रकरणातील महिलेस अटक
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमधून कमी किमतीत शिलाई मशीन घेऊन बाहेर दुप्पट किमतीने विकण्याचे आमिष दाखवून बेंटेक्स दागिन्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारास सुमारे १ लाख ८० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या संशयित महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी आज, मंगळवारी अटक केली. शीतल सखाराम खराडे (वय २४, रा. हसूर दुमाला, ता. करवीर) असे तिचे नाव आहे.
फिर्यादी अनिल सुरेश गोसावी (रा. लक्षतीर्थ वसाहत) यांचे अंबाबाई मंदिर परिसरात बेंटेक्स दागिन्यांच्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानात दि. २ मार्चला संशयित महिला शीतल खराडे खरेदीसाठी आली. त्यानंतर वारंवार येऊ लागल्याने ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत शीतलने अनिल यांना जिल्हा परिषदेमध्ये ओळख आहे. शासनाकडून आलेली शिलाई मशीन कमी किमतीत घेऊन बाहेर दुप्पट किमतीने विकू असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले. (प्रतिनिधी)