महिलेवर अत्याचारास सहाय्य केल्याप्रकरणी महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:47+5:302021-01-13T05:05:47+5:30
कोल्हापूर : परप्रांतीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यास सहाय्य केल्याबद्दल मंगळवारी करवीर पोलिसांनी सीमा दिलीप योगी (२२, रा. मूळ ...

महिलेवर अत्याचारास सहाय्य केल्याप्रकरणी महिलेस अटक
कोल्हापूर : परप्रांतीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यास सहाय्य केल्याबद्दल मंगळवारी करवीर पोलिसांनी सीमा दिलीप योगी (२२, रा. मूळ गाव राजस्थान, सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) या महिलेस अटक केली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसाम येथील पीडित विवाहितेला तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला रामकरण योगी याच्याशी विवाह करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेवर आसामसह राजस्थान व कोल्हापुरात सामूहिक अत्याचार करण्यात आले. पाचगाव (ता. करवीर) येथे भाड्याने राहत असताना पीडित महिलेने रविवारी करवीर पोलिसांत अत्याचाराची तक्रार दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सोमवारी रामकरण बन्सीधर योगी (३५), दिलीप रामेश्वर योगी (३० दोघेही रा. राजस्थान) यांना अटक केली तर मंगळवारी सकाळी सीमा दिलीप योगी या महिलेस अटक केली. या तिघांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.