शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हद्दवाढीशिवाय कोल्हापूरला एक रुपयाचाही निधी नाही, अजित पवार यांनी प्रशासकांना सुनावले; पालकमंत्र्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:14 IST

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मागण्यासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासक गेल्या होत्या. तिथे त्यांना पवार यांनी ...

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मागण्यासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासक गेल्या होत्या. तिथे त्यांना पवार यांनी पुण्याची हद्दवाढ आतापर्यंत २७ वेळा झाली. कोल्हापूर का होत नाही, असे विचारून हद्दवाढीशिवाय एक रुपयांचाही निधी नाही, असे सुनावल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी दिली.कोल्हापूर फर्स्ट या फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. पॅव्हेलियन हॉटेलमधील मधुसूदन हॉलमध्ये कार्यक्रम झाला.पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे; पण हद्दवाढ अनेक वर्षांपासून रंकाळा आणि कळंब्याच्या पुढे गेली नाही. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या दोन आमदारांना आणि गावांना विश्वासात घेऊन हद्दवाढ व्हावी. हद्दवाढीत शहरालगतची उचगाव, पाचगाव, गोकुळ शिरगाव, अशी गावे प्राधान्याने घेतली पाहिजे.चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना ४१ गावांसह हद्दवाढीचा विषय पुढे आला. हा निर्णय अंतिम टप्प्यात असतानाही काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला. यामुळे ४२ गावांचे प्राधिकरण तयार झाले. प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांचा विकास होऊन शहरात ती गावे येण्यास अनुकूल होणे अपेक्षित होते; पण नुकतीच बैठक घेतली त्यावेळी अजून प्राधिकरणाची सुरुवातही झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे प्राधिकरणाचा विकास आराखडा तयार करून गावांचा विकास करण्यात येणार आहे.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी विमान, रेल्वेची सुविधा चांगली केली जात आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेसाठीही पाठपुरावा सुरू आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्रात पाठपुरावा करीत आहे. मात्र, आता केवळ लोकप्रतिनिधींवर अवलंबून न राहता उद्योजकांनीही विकासासाठी पुढे यावे. शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मेळावा घेऊन मी आणि राजेश क्षीरसागर यांनी भूमिका मांडली. राजकीय नेते म्हणून आम्हाला मर्यादा आहेत. म्हणून उद्योजकांनीही याच्या समर्थनार्थ उतरले पाहिजे.आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, मित्र संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास केला जात आहे. शक्तिपीठच्या माध्यमातून शहराचा विकास होणार आहे. हद्दवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आयटी पार्कसाठी १०० एकर जागा शेंडा पार्क येथे मिळविण्यात येईल.

यावेळी आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार अशोक माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांनी स्वागत केले. समन्वयक सुरेंद्र जैन यांनी प्रास्ताविक केले.

शहरातील रस्ते आनंदी आनंदचकरवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रोज अनेक भाविक, पर्यटक शहरात येतात; पण शहरातील रस्ते आनंदी आनंदच आहेत, असा उपरोधिक टोला पालकमंत्री आबिटकर यांनी लगावला. बांधकाम, फायरचे परवाने लवकर मिळत नाहीत. विमानतळाचा विकास झाला पण स्टारच्या विमानाचे मुंबईचे दरही परवडतील असे पाहिजे, अशी अपेक्षाही आबिटकर यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर विरोध करणारे, कृती समितीचे शहरखासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर शहर विरोध करणारे, कृती समित्यांचे म्हणून बाहेर ओळखले जात आहे. मटणाचे दर वाढले म्हणून येथे आंदोलन झाले आहे. विरोध करणे, आंदोलन करणे जिवंतपणाचे लक्षण आहे; पण सरसकट सर्वच प्रकल्पांना विरोध केल्यास विकासाला खीळ बसल्याचा धोका आहे.

निमंत्रण पत्रिकेत नाव; पण प्रत्यक्षात गैरहजरकार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव असलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर हे गैरहजर राहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकर