शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ जंगलात स्फोट केले, कोणालाच कसे नाही कळले?; दहशतवाद्यांच्या मदतनिसांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:42 IST

पोलिस, वनविभागाकडून तपास सुरू 

कोल्हापूर : कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. एवढा गंभीर प्रकार घडूनही पोलिस आणि वनविभागाला याची काहीच माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक मदतनिसांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.दुचाकी चोरीच्या संशयावरून कोथरूड पोलिसांनी अटक केलेले तरुण दहशतवादी असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. त्यांच्याकडे मिळालेल्या पेनड्राइव्हमधून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. या माहितीनुसार दहशतवाद्यांनी गेल्या वर्षभरात कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेतल्या. या माहितीचा अहवाल पोलिसांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध होताच, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी दहशतवादविरोधी विभागाचे अधीक्षक जयंत मीना यांच्याशी मोबाइलवरून चर्चा केली. इसिस या दहशतवादी संस्थेशी संबंधित असलेल्या स्थानिक संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. स्थानिक दहशतवादविरोधी पथकाकडूनही दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू आहे.

कोल्हापूर सॉफ्ट टार्गेट?शहरातून यापूर्वी इसिसशी संबंधित एका संशयिताला पोलिसांनी अटक केली होती. ताराबाई पार्क परिसरातील एका तरुणाचा दहशतवादी संघटनेत समावेश असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता थेट बॉम्बस्फोटाच्या चाचण्याच झाल्याची माहिती समोर आल्याने दहशतवाद्यांसाठी कोल्हापूर सॉफ्ट टार्गेट आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मदतनीस कोण?परराज्यातून आलेले दहशतवादी स्थानिकांची मदत घेतल्याशिवाय जंगलात जाऊन बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेणे शक्य नाही. त्यांना मदत करणारे स्थानिक कोण आहेत? ते किती दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते? त्यांनी दहशतवादी कारवायांचे काही कट केले आहेत काय? ते कोणत्या दहशतवादी संघटनांसाठी काम करतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागPoliceपोलिसterroristदहशतवादी