चौगुले वॉरियर्सची विजयी सलामी

By Admin | Updated: March 22, 2016 01:01 IST2016-03-22T01:01:08+5:302016-03-22T01:01:08+5:30

केपीएल २०१६ स्पर्धा : प्रथम स्पोर्टस्, एअर इंडियाचीही प्रतिस्पर्ध्यांवर मात

Winning trio of Chougule Warriors | चौगुले वॉरियर्सची विजयी सलामी

चौगुले वॉरियर्सची विजयी सलामी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व संजय घोडावत गु्रपच्यावतीने आयोजित ‘केपीएल-२०१६’ स्पर्धेत सोमवारी गोव्याच्या चौगुले वॉरियर्सने कोल्हापूर रॉयल्सवर दणदणीत, तर प्रथम स्पोर्टस्ने मुंबईच्या प्रीझम स्पोर्टस्चा व बलाढ्य एअर इंडियाने डी. वाय. पाटील संघाचा चुरशीच्या सामन्यात पराभव करत विजयी सलामी दिली.
शास्त्रीनगर मैदानावर सोमवारी सकाळच्या सत्रात पहिला सामना गोव्याच्या बलाढ्य चौगुले वॉरियर्स व कोल्हापूर रॉयल्स यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर रॉयल्स संघाचा डाव चौगुलै वॉरियर्सच्या तिखट माऱ्यापुढे १५ षटकांत सर्वबाद ५४ धावांत गुंडाळला. त्यामध्ये अतिष वर्पेने १३, वैभव चौगुलेने १३ धावा केल्या. चौगुले वॉरियर्सकडून धु्रमल मटकरने चार, तर शेखबहादुर यादवने २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल चौगुलै वॉरियर्सने ५४ धावांचे आव्हान केवळ पाच षटकांत बिनबाद ५६ धावा करत पार केले. सूर्या डोंगरेने १९, तर गही गावकरने ३२ धावा केल्या. चौगुले वॉरियसचा धु्रमल मटकर सामनावीर ठरला.
दुसरा सामना प्रथम स्पोर्टस् व मुंबईच्या प्रीझम स्पोर्टस् यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना प्रीझम संघाने २० षटकांत सर्वबाद ९९ केल्या. त्यामध्ये सुफियाल रहिमानीने नाबाद २५, तर अभिषेक श्रीवास्तव याने २२ धावा केल्या. प्रथम स्पोर्टस्कडून सागर सावंतने ३, तर संतोष शिंदेने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल प्रथम स्पोर्टस्ने १७.२ षटकांत ७ बाद १०० धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. जीवन जोशीने २७, तर सलमान अहमद ११, सुमित चव्हाणने नाबाद २० धावा केल्या. प्रीझम संघाकडून सोनसिंगने तीन, तर सुनील चावरेने १ बळी घेतला. सुमित चव्हाण सामनावीर ठरला.
तिसरा सामना एअर इंडिया व डी. वाय. पाटील संघ यांच्यात झाला. एअर इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद १४८ धावा केल्या. त्यामध्ये प्रशांत नाईकने २९, आकर्षक गोमेल ३२, अमेय सोमनने २३ धावा केल्या. डी. वाय. पाटील संघाकडून शशांग सिंगने १२ धावांत ४, तर अजिम अन्सारीने २७ धावांत ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल डी. वाय.पाटील संघाचा डाव १९.४ षटकांत सर्वबाद १४३ धावांवर आटोपला. योगेश ताकवलेने ३०, केविन अलमेडाने ३७, तर योगेश पवारने २५ धावा केल्या. एअर इंडियाकडून अमन सोमण व रौनक शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. एअर इंडियाने हा सामना ५ धावांनी जिंकला. एअर इंडियाचा प्रशांत नाईक सामनावीर ठरला.

पोलीस अधीक्षक देशपांडे, महापौर रामाणे यांच्या हस्ते उद्घाटन
शास्त्रीनगर मैदानावर रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे व महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन व चषक अनावरण सोहळा झाला. यावेळी संजय घोडावत गु्रपचे उदय जोशी, माई हुंडाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे संयोजन ‘केडीसीए’चे अध्यक्ष आर. ए. तथा बाळ पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, उपाध्यक्ष चेतन चौगुले, सचिव रमेश कदम, तेजोमय खर्डेकर, बापू मिठारी, केदार गयावळ, अभिजित भोसले, विश्वजित महागांवकर, रोहन भुर्इंबर, अजित मुळीक, निसार मुजावर, जनार्दन यादव आदींनी केले. सामन्याचे धावते वर्णन अंकुश निपाणीकर, सुनील घोडके, तर स्कोरर स्वप्निल कदम, सामना निरीक्षक म्हणून चंदाराणी कांबळे आदी काम पाहत आहेत.

Web Title: Winning trio of Chougule Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.