विजेते वेटलिफ्टर भारावले

By Admin | Updated: August 7, 2014 00:21 IST2014-08-06T23:36:23+5:302014-08-07T00:21:47+5:30

जयसिंगपुरात जंगी स्वागत : नगरपालिकेकडून सत्कार

The winners get the weightlifter loaded | विजेते वेटलिफ्टर भारावले

विजेते वेटलिफ्टर भारावले

जयसिंगपूर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात क्रीडापटूंनी मिळविलेल्या यशामुळे कुरुंदवाडचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. खेळाडूंनी अतिशय कष्ट घेऊन जे घवघवीत यश मिळविले, ही अभिमानास्पद बाब असून, आॅलिम्पिकमध्येही खेळाडूंनी चमक दाखवावी. भविष्यात या खेळाडूंना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी दिली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केलेल्या कुरुंदवाडच्या गणेश माळी, चंद्रकांत माळी व ओंकार ओतारी यांचे शहरात नगरपालिकेच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करून येथील नगरपालिकेच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षप्रतोद पाटील बोलत होते.
मुंबईहून आज, बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता क्रीडापटूंचे जयसिंगपुरात आगमन झाले. नगराध्यक्षा सुनीता खामकर, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, संगीता पाटील-कोथळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडापटूंना फेटा बांधून शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.यावेळी नगरसेवक शिवाजी कुंभार, युवराज शहा, सुनील पाटील, सुनील मजलेकर, संभाजी मोरे, आप्पासो खामकर, रेखा देशमुख, राणी धनवडे, स्नेहा शिंदे, अजित उपाध्ये, अर्जुन देशमुख, गुरुदास पवार, राजेंद्र पाटील-ऐतवडेकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह नगरपालिका कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Web Title: The winners get the weightlifter loaded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.