मास्टर गारमेंट क्लब बांबवडे प्रीमियमचा विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:25+5:302020-12-05T04:54:25+5:30
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे आयोजित बांबवडे प्रीमियम लीगचे विजेतेपद मास्टर गारमेंट स्पोर्ट क्लबने पटकावले. बांबवडे ...

मास्टर गारमेंट क्लब बांबवडे प्रीमियमचा विजेता
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे आयोजित बांबवडे प्रीमियम लीगचे विजेतेपद मास्टर गारमेंट स्पोर्ट क्लबने पटकावले.
बांबवडे येथे गेल्यावर्षीपासून बांबवडे लीग सुरू झाली आहे. यामध्ये मास्टर गारमेंटने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना दहा हजार रुपये रोख व चषक साळशीचे उपसरपंच व उद्योजक प्रकाश पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच बालाजी रॉयल्स क्लबने द्वितीय क्रमांक पटकावला, तर रिद्धी इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे सात हजार व पाच हजार आणि चषक देण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन प्रकाश पाटील, रवी खुटाळे, योगेश निकम, राजू बुवा, अक्षय जाधव, राहुल कांबळे, अभिलाश घोडे पाटील, अंकुश घोडे पाटील, रवी नारकर व इतर कार्यकर्त्यांनी केले .
०३ बांबवडे प्रीमियम लीग
फोटो - प्रथम क्रमांकाचे बक्षीस देताना मास्टर गारमेंट खेळाडू ,मालक व प्रकाश पाटील.