वादळी पावसाने हाहाकार!

By Admin | Updated: May 8, 2014 12:05 IST2014-05-08T12:05:58+5:302014-05-08T12:05:58+5:30

ढेबेवाडी भागाला झोडपले : उंब्रज, मसूर भागातही अनेक कुटुंबीयांच्या डोक्यावरचे छप्पर उडाले

Windy rains! | वादळी पावसाने हाहाकार!

वादळी पावसाने हाहाकार!

 ढेबेवाडी : ढेबेवाडी विभागातील सुतारवाडी, मान्याचीवाडी परिसरास बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वार्‍याच्या तडाख्यात येथील ३० घरांची छप्परे उडाली. घरांच्या भिंती पडल्याने एक म्हैस आणि एक बैल जखमी झाला. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुतारवाडी, मान्याचीवाडी परिसरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळू लागला. विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍याचा मोठा जोर असल्याने ग्रामस्थांनी दारे, खिडक्या लावून घरात बसणे पसंत केले. अनेक घरांवरची छपरे उडून दुसर्‍या घरांवर कोसळली. या वादळी वार्‍याचा सर्वाधिक तडाखा सुतारवाडी येथील कुटुंबीयांना बसला. सुतारवाडीतील प्रकाश पाचुपते, विलास पाचुपते, सुरेश पाचुपते, सुशीला पाचुपते, प्रकाश सुतार, अनिल पेंढारी, सुरेश पेंढारी, पांडुरंग पेंढारी, हिंदुराव माने, प्रकाश माने, प्रशांत माने, प्रवीण माने, संजय माने, मोहन माने, दिलीप माने, मंगेश माने, श्ांकर माने, हिंदुराव कदम, बनूबाई कदम, सुरेश कदम, श्रीपती भाईगडे, हिंदुराव भाईगडे, शिवाजी भाईगडे (सर्व रा. सुतारवाडी), चंद्रकांत माने, जालिंदर माने, बबन माने, शामराव पाचुपते (सर्व रा. मान्याचीवाडी), गणपती नारायण जाधव (साबळेवाडी) आदींच्या घरांची छपरे उडून गेली. काहीच्या घरांच्या भिंतींची पडझड झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी ढेबेवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, तलाठी आर. एस जाधव, ग्रामसेवक प्रसाद यादव, एम. व्ही. शेळके यांनी वादळाने झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. दरम्यान, त्रिपुडी, ता. पाटण येथील शिवाजी अर्जुन चव्हाण, कृष्णत महिपती चव्हाण, ज्ञानू राघू देसाई यांच्या घराचे पत्रेही वादळी पावसामुळे उडाले. (वार्ताहर)

Web Title: Windy rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.