दिवसभर वारे, सायंकाळी हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:22 IST2021-05-16T04:22:36+5:302021-05-16T04:22:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचे चक्रीवादळात रूपांतर झाल्याने कोल्हापुरात दिवसभर पावसाळी वातावरणासह ...

Winds throughout the day, light showers in the evening | दिवसभर वारे, सायंकाळी हलक्या सरी

दिवसभर वारे, सायंकाळी हलक्या सरी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचे चक्रीवादळात रूपांतर झाल्याने कोल्हापुरात दिवसभर पावसाळी वातावरणासह जोरदार वारे वाहत होते. सायंकाळी कोल्हापूर शहरात पाऊस झाला. आज, रविवारी जाेरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात ‘ताउते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या काही भागांना बसण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ व पावसाचे वातावरण राहिले. सकाळपासूनच जोरदार वारे वाहत होते, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने खिडक्यांची तावदाणे, पत्रे जोरजोरात वाजत होते. किमान तापमान २६ डिग्री, तर कमाल ३४ डिग्रीपर्यंत राहिले. त्यामुळे काहीसा उष्मा पण जाणवत होता. सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र आकाश काहीसे मोकळे झाले.

आज मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तापमानात मोठी घट होणार असून कमाल तापमान २८ डिग्री, तर किमान १९ डिग्रीपर्यंत राहणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे.

फोटो ओळी : कोल्हापुरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. आकाशात अशी ढगांची दाटी झाली होती. (फोटो-१५०५२०२१-कोल-रेन व रेन०१) (छाया- आदित्य वेल्हाळ)

Web Title: Winds throughout the day, light showers in the evening