शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:47 IST

मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणी करुन राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार

इचलकरंजी : मणिपूरला शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट देऊन परिस्थितीची स्वत: पाहणी करणार आहे. राष्ट्रपतींनाही मणिपूर घटनेसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शहरात सुरू केलेले ‘७२ तास आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन’ची सांगता गुरुवारी केली. वीर पत्नींच्या हस्ते त्यांना सरबत देण्यात आले.मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि येथील माता-भगिनींच्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी आपण देशवासीय असमर्थ ठरलो याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी ७२ तास अन्नत्याग केला होता. सुमनदेवी प्रकाश चव्हाण (शिरोळ), सुलभाताई रावसाहेब पाटील (टाकवडे), उज्ज्वला जोतिराम चौगुले (अतिग्रे) व सुनीता विजय मोरे (सांगली) या वीर पत्नींच्या हस्ते नारळ पाणी घेऊन त्यांनी आंदोलनाची सांगता केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.शेट्टी म्हणाले, एका निर्भया प्रकरणामुळे देशामध्ये सत्तांतरण घडले होते. याचा इतिहास राज्यकर्त्यांना नजरेआड करता येणार नाही. चंद्र-तारे असेपर्यंत कोणाला सत्ता करायची आहे, त्यांनी सत्ता करावी. मात्र, या देशातील महिला, निराधार, मुले यांच्या संरक्षणाची जबाबदारीही उचलावी. अशा घटना घडतील असतील, तर नागरिक गप्प बसणार नाहीत. आम्ही प्राणपणाने या घटनांचा विरोध करू.मी स्वत: मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणार आहे. राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार आहे. यावेळी जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, विकास चौगुले, हेमंत वणकुंद्रे, बसगोंडा बिराजदार, सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापुरे, अविनाश कोरे, सचिन शिंदे, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, निवृत्ती शिरगुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरManipur Violenceमणिपूर हिंसाचारRaju Shettyराजू शेट्टी