शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:20 IST

कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी २५ वर्षे लढा दिला. न्या. भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर खंडपीठासाठी अनुकूलता दर्शविली.

दीप्ती देशमुखउपमुख्य उपसंपादक

मुंबई उच्च न्यायालयाचेकोल्हापूर खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे. मात्र, त्याबाबत  आश्वासक पावले उचलली गेली नव्हती, परंतु १२ जुलैला कोल्हापूरमधील कुटुंब न्यायालयाच्या इमारतीतील न्यायालयाचा कारभार अन्यत्र हलविण्यात आला आणि इमारतीच्या नूतनीकरण सुरू झाले. त्यातूनच  कोल्हापूर खंडपीठ स्थापण्याची चर्चा सुरू झाली. १६ ऑगस्टला खंडपीठाचे उद्घाटन होणार, असेही म्हटले जाते. परंतु वकील आणि पक्षकारांमध्ये संभ्रम आहे. खंडपीठ स्थापनेची जाहीर घोषणा होणे अपेक्षित असताना लपवालपवी का केली जात आहे? असा प्रश्न वकिलांना पडला आहे.  

कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी २५ वर्षे लढा दिला. प्रत्येक मुख्य न्यायमूर्तींना साकडे घातले. मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी अनुकूलता दर्शवली होती. त्यानंतरही प्रश्न प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर खंडपीठासाठी अनुकूलता दर्शविली आणि काही दिवसांतच हालचालींना वेग आला. 

कोल्हापूर खंडपीठ स्थापल्यास त्याच्या अधिकारक्षेत्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सहा जिल्हे येतील. काहींच्या मते, या सहाही जिल्ह्यांतील बार अध्यक्षांना सरन्यायाधीश गवई यांनी खंडपीठ स्थापण्याचे आश्वासन दिले आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अधिकृत दुजोरा मिळत नाही. खंडपीठ स्थापनेमुळे सहा जिल्ह्यांतील नागरिकांना उच्च न्यायालयात दाद मागणे सोपे होईल आणि न्याय जलदगतीने मिळेल, अशी अपेक्षा आहे. ‘न्याय आपल्या दारी’ ही उक्ती खरी ठरेलही. मात्र, मुंबईत बसून सहा जिल्ह्यांतील खटले लढविणाऱ्या वकिलांसाठी हा धक्का असेल.   

डिजिटल युगात कोल्हापूर खंडपीठाची आवश्यकता आहे का? याचिका दाखल करण्यासाठी ई-फायलिंगची सुविधा आहे. उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपणही केले जाते.  शिवाय, कायद्यातील तरतुदींचा अन्वयार्थ लावताना न्यायमूर्तींची मते सारखीच असणे आवश्यक आहे आणि ती गरजही आहे. असे असताना आणखी एक खंडपीठ वाढवून वेगळी मते निर्माण होण्यास हे खंडपीठ कारणीभूत तर ठरणार नाही ना? असे प्रश्न काही वकिलांना पडले आहेत. तर दुसरीकडे, काही मूठभर वकिलांसाठी दीड कोटी जनतेला न्याय सुलभ रीतीने मिळविण्यापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही, अशीही भावना व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूर खंडपीठ झाले तर मुंबई उच्च न्यायालयाचे विकेंद्रीकरण होऊन प्रकरणे जिल्हानिहाय विभागली जातील. मुंबईतील वकिलांची फी जास्त आहे. त्यामुळे सामान्यांना न्याय मिळवणे  ‘महाग’ आहे. दहा-बारा तास प्रवास करून मुंबईला जाणे परवडत नाही. लोक न्यायालयाबाहेरच तडजोड करतात किंवा अन्याय सहन करतात. खंडपीठामुळे हे चित्र पालटेल.  

अद्याप खंडपीठ स्थापण्याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने त्यांना आता २३ जुलैची प्रतीक्षा आहे. कारण या दिवशी खंडपीठाच्या स्थापनेबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय