शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून एकच उमेदवार देण्यासाठी पुढाकार घेणार : सतेज पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 10:20 IST

कोल्हापूरचा आमदार करायचा, अशी एकवाक्यता हवी. आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकले पाहिजे आणि तुम्ही त्याच्याशी बांधील राहिला पाहिजेत, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.

ठळक मुद्देशिक्षक आमदार कोल्हापूरचा करण्यासाठी एकसंध राहूया

कोल्हापूर : शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून इच्छुक जास्त असले तरी सर्वांना विश्वासात घेऊन एकच उमेदवार निश्चित केला जाईल. यावेळी कोणत्याही परिस्थतीत शिक्षक व पदवीधर आमदार हा कोल्हापूरचाच झाला पाहिजे, यासाठी एकसंध राहूया, असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत मुश्रीफसाहेब आपणास याबाबत बसावे लागणार आहे. कोल्हापुरातून इच्छुक भरपूर आहेत. आपापसांत चर्चा करून कोणाही एकाचे नाव निश्चित करा.

जिल्ह्यात पदवीधर आणि शिक्षक दोन आमदार झाले तर जिल्ह्याच्या दृष्टीने हे भूषणावह आहेच; मात्र विकासाला चालनाही मिळेल. सर्व गटांमध्ये समन्वयासाठी प्रयत्न करूया. कोल्हापूरचा आमदार करायचा, अशी एकवाक्यता हवी. आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकले पाहिजे आणि तुम्ही त्याच्याशी बांधील राहिला पाहिजेत, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.‘कोजिमाशि’ पाहिजे तर आमदारकी नाहीआपल्या भांडणात आजपर्यंत कोल्हापूरला शिक्षक मतदारसंघातून संधी मिळालेली नाही. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील संस्था वाटून घ्या, ज्याला ‘कोजिमाशि’ पाहिजे आहे, त्यांनी आमदारकीकडे यायचे नाही, सगळे व्यवस्थित होईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलMLAआमदारkolhapurकोल्हापूर