शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Kolhapur: रेंदाळची खण इचलकरंजीची तहान भागविणार ?, विस्तीर्ण खणीचा गांभीर्याने विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:44 IST

अरुण काशीद इचलकरंजी : इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी जलस्त्रोताचा शोध रेंदाळ (ता. हातकणंगले) खण आणि कालव्यापासून सुरू झाला ...

अरुण काशीदइचलकरंजी : इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी जलस्त्रोताचा शोध रेंदाळ (ता. हातकणंगले) खण आणि कालव्यापासून सुरू झाला आहे. रेंदाळपासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टेकडीवर खण असून, तेथील परिसरही विस्तीर्ण आहे. एकूण गायरान क्षेत्रातील ३०.३१ हेक्टर क्षेत्राचे वाटप केले आहे.इचलकरंजीसाठी दानोळी (ता.शिरोळ) व सुळकूड (ता.कागल) पासून सुरू झालेला पर्यायी पाणी योजनेचा शोध आता रेंदाळ खणीपर्यंत येऊन थांबला आहे. रेंदाळ गावच्या दक्षिणेकडील कारदगा-रेंदाळ मार्गावरील टेकडीवर असणाऱ्या गायरान जागेवर ५ एकर १२५ गुंठ्यांमध्ये लहान-मोठ्या दोन खणी आहेत. २०१७ पासून या खणींचे उत्खनन बंद आहे. या खणींमध्ये दूधगंगा डाव्या कालव्याचे पाणी टाकून तेथून शहराला पाणी देण्याचा विचार शासन करीत आहे.या टेकडीवर पाच गट असून, ७८.९० हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३०.३१ हेक्टर क्षेत्र बेघर, देवदासी, गावठाण आणि सौरऊर्जेसाठी वाटप करण्यात आले आहे, तर ४८.५९ हेक्टर क्षेत्र शिल्लक आहे. शिल्लक असलेल्या या क्षेत्रांतूनच दूधगंगा डावा कालवा गेला आहे. खणीलगतच कालवा असून, त्यामध्ये झाडे उगवली आहेत.खणीचा आकारही ओबडथोबड आहे. शहराला येथून पाणीपुरवठा करावयाचा झाल्यास लहान-मोठ्या दोन्ही खणी जोडून घ्याव्या लागणार आहेत. कालव्यालगत घनकचरा डेपोही आहे. तेथेच कचरा आणून टाकला जातो. हे ठिकाण उंचावर असल्याने काही अंतरापर्यंत सायपन पद्धतीने पाणी आणता येऊ शकते, त्यादृष्टीने प्रशासन विचार करण्याची शक्यता आहे.

रेंदाळ खणीची सद्य:स्थिती

  • खणीचे ठिकाण - रेंदाळ (रेंदाळ-कारदगा रस्त्यावर)
  • खणींची संख्या - २
  • मोठ्या खणीचे क्षेत्र - सुमारे ४ एकर
  • लहान खणीचे क्षेत्र - सुमारे १ एकर
  • खणीची खोली - ३० ते ३५ फूट
  • रेंदाळ गावापासून अंतर - सुमारे अडीच किलोमीटर.
  • इचलकरंजीपासून अंतर - सुमारे १२ किलोमीटर.
  • पाणी साठविण्याची क्षमता - ३ ते ४ दशलक्ष लिटर (अंदाजे)
  • कालव्याचे ठिकाण - खणीलगत
  • कालव्याची खोली - सुमारे ७० ते ८० फूट

अहवालाची प्रतीक्षापर्याय सूचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली समिती विविध अंगाने रेंदाळ खणीचा विचार करीत आहे. १५ एप्रिलपर्यंत अहवाल देणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने समिती काम करीत आहे. असे असले, तरी शहरवासीयांना त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीichalkaranji-acइचलकरंजी