शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : फडवणीस यांची ग्वाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 19:20 IST

कागल : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी हे नियुक्ती अभावी अडचणीत आले आहेत. या विद्यार्थ्यांना ...

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार देवेंद्र फडवणीस यांची ग्वाही , मुंबईत समरजित घाटगे यांनी विद्यार्थ्यांसमवेत घेतली भेट

कागल : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी हे नियुक्ती अभावी अडचणीत आले आहेत. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिली.राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह समरजित घाटगे यांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. एमपीएससीमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्रे तातडीने द्या, असे न्यायालयीन आदेश असतानासुद्धा राज्य शासनाने या नियुक्त्या केलेल्या नाहीत. सुमारे २१८५ विद्यार्थी हक्काच्या नोकरीपासून वंचित आहेत. परीक्षा उत्तीर्ण होवून सुद्धा दोन- दोन वर्षापासून हे विद्यार्थी न्यायासाठी झगडत आहेत. शैक्षणिक प्रवेश, सवलतीमध्ये आम्हाला न्याय द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी यावेळी केली.

विद्यार्थ्यांच्या मागण्या विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सविस्तर समजून घेतल्या. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण निश्चितपणे विधानसभेत आवाज उठवू अशी ग्वाही त्यांनी दिली. सुपर न्युमररीचा पर्याय वापरून शासनाने या सर्व विद्यार्थ्यांना सामावून घ्यायला हवे, असे सांगत यासाठी मी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करेन असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाBJPभाजपाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMumbaiमुंबईkolhapurकोल्हापूर