विकासकामांसाठी निधी देणार : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:57+5:302021-01-25T04:23:57+5:30

जयसिंगपूर : समर्थक अथवा विरोधक असा दुजाभाव न करता शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावाला विकासकामांसाठी न्याय दिला जाईल, असे आश्वासन ...

Will provide funds for development works: Minister of State Rajendra Patil-Yadravkar | विकासकामांसाठी निधी देणार : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

विकासकामांसाठी निधी देणार : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर : समर्थक अथवा विरोधक असा दुजाभाव न करता शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावाला विकासकामांसाठी न्याय दिला जाईल, असे आश्वासन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले.

शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जवळपास २३ गावांमध्ये राज्यमंत्री यड्रावकर यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी समविचारी लोक, पक्ष व संघटनांना एकत्रित घेऊन सत्ता मिळविण्यात यश मिळविले आहे. जयसिंगपूर येथील संपर्क कार्यालय व निवासस्थानी तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिपरी, बुबनाळ, उदगाव, शिरटी, नृसिंहवाडी, दत्तवाड, मजरेवाडी यांसह अन्य गावांतील नूतन सदस्य व आघाडीच्या गटनेत्यांनी मंत्री यड्रावकर यांची भेट घेतली. यावेळी सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

फोटो - २३०१२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत सदस्य व गटनेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावकर मादनाईक, प्रा. राजाराम वरेकर, मन्सूर मुल्लाणी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

Web Title: Will provide funds for development works: Minister of State Rajendra Patil-Yadravkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.