शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

हवे तर बुरखा घालणार नाही, मात्र हिजाब घालूनच वर्गात बसणार, बेळगावातील विद्यार्थिनींचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 11:24 IST

विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाविरुद्ध घेतला आक्रमक पवित्रा

बेळगाव : हिजाब हा आमचा हक्क असल्यामुळे आम्हाला हिजाब घालून वर्गात प्रवेश दिला जावा, अशी मागणी करत तीन विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याची घटना शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये घडली.

राज्यातील सर्व पदवीपूर्व पदवी महाविद्यालय आजपासून सुरू झाली आहेत. तथापि हिजाब-केशरी स्कार्फ वगैरे परिधान न करता विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करून महाविद्यालयामध्ये यावे. न्यायालयाच्या आदेशाचे कुणीही उल्लंघन करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.मात्र महाविद्यालय सुरू झालेल्या आजच्या पहिल्या दिवशी शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये तीन विद्यार्थिनी आदेशाचे उल्लंघन करत हिजाब परिधान करून आल्या होता. त्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यावेळी संबंधित विद्यार्थिनींनी हिजाब हा आमचा हक्क आहे. आम्ही हवे तर बुरखा घालणार नाही, मात्र हिजाब घालूनच आम्ही वर्गात बसणार असे सांगून आक्रमक पवित्रा घेतला. तसेच या विद्यार्थिनीने हिजाबच्या समर्थनार्थ कॉलेज आवारात घोषणाबाजी सुरू केली.

या प्रकारामुळे कॉलेज आवारात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना समजावून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. दरम्यान, माध्यमिक शाळांमागोमाग आता महाविद्यालयेदेखील सुरू झाल्यामुळे सर्व समाजातील जाणकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. शांतता व सलोखा राखावा, असे आवाहन पोलिसांनी आणि शिक्षण खात्याने केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकStudentविद्यार्थी