शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..तोपर्यत गावात जाणार नाही, बेडगमधील आंबेडकरी समाजाचा माणगावात निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 15:38 IST

'सरकारने मागणी मान्य करावी अन्यथा परिणाम भोगावे लागतील'

अभय व्हनवाडे रूकडी/माणगाव : 'जोपर्यंत कमान उभा राहणार नाही तो पर्यत बेडग येथे आम्ही परतणार नाही, अशा ठाम निर्धार बेडग (ता. मिरज, जि. सांगली) येथील आंबेडकरी समाज बांधवांनी माणगाव (ता. हातकणगंले. जि. कोल्हापूर) येथे केले.बेडग येथोल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी आंबेडकरी समाज ऐतिहासिक माणगाव येथोल डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जमला होता. अभिवादन करून याठिकाणापासून त्यांनी मुंबई मंत्रालयापर्यत पदयात्रा मोर्चास सुरूवात केली. बेडग येथील कमानाचा वाद तीन महिन्यापासून धुमसतच आहे. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कमान शासनातर्फे  उभारण्याचा आश्वासन देवून ही बेडग येथील ग्रामस्थांनी गावात कोणत्याही महापुरूषाच्या नावे कमान उभी करायची नाही असा ठराव केला. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. बेडग येथे स्वागत कमान उभारण्याची मागणी आता राज्यातून होत आहे. आंबेडकरी समाजाची मागणी सरकारने मान्य करावी अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा माजी आमदार राजीव आवळे यांनी दिला.दरम्यान आर.पी.आयचे जिल्हाध्यक्ष  उत्तम कांबळे यांनी शासनाने लवकरात लवकर कमान उभी करावी अन्यथा कायदेशीर बाब निर्माण झाल्यास याची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा दिला. तेलगंण विभागांचे प्रभारी  प्रभारक विनोद निकाळजे, अध्यक्ष अमर कांबळे, नंदकुमार शिंगे, मुरलीधर  कांबळे, शिरीष मधाळे, नितिन गवळी, बापू सनदी, निलेश गवळी, प्रदिप बिराजे, साताप्पा बिराजे यांच्यासह  मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.पदयात्रेस माणगाव गावचा पाठिंबा बेडगहून जवळपास 1000 महिला व पुरुष माणगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास  जमले होते. याठिकाणी माणगावचे सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार यांनी माणगाव ते मुंबई पदयात्रेस गावचा पाठिंबा जाहीर केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगली