शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पगार वेळेत मिळाला नाही तर तक्रार करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 11:24 IST

CoronaVirus Doctor CprHospital Kolhapur: एक तर पाच महिन्यांचा अजूनही पगार दिलेला नाही. उलट जर पुढे पुन्हा चार महिन्यांची नोकरी हवी असेल तर पगार वेळेत मिळाला नाही म्हणून तक्रार करणार नाही, असे लेखी हमीपत्र मागण्याचा उद्दामपणा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने केला आहे. विनापगार चार महिने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे.

ठळक मुद्देपगार वेळेत मिळाला नाही तर तक्रार करणार नाहीवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने चोळले डॉक्टरांच्या जखमेवर मीठ

कोल्हापूर : एक तर पाच महिन्यांचा अजूनही पगार दिलेला नाही. उलट जर पुढे पुन्हा चार महिन्यांची नोकरी हवी असेल तर पगार वेळेत मिळाला नाही म्हणून तक्रार करणार नाही, असे लेखी हमीपत्र मागण्याचा उद्दामपणा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने केला आहे. विनापगार चार महिने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे.वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालय येथील ५८ वैद्यकीय अधिकारी आणि सहायक प्राध्यापक यांना गेले पाच महिने पगार नाही. याबाबत मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन झाली आहेत.

१६ जुलै रोजी या सर्व डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांनी या सर्वांशी चर्चा करून लवकर पगार करण्याची ग्वाही दिली होती. ते स्वत: वैद्यकीय सचिवांशी बोलले होते. तरीही पगार झालेला नाही. केवळ काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एका महिन्याचा पगार करण्यात आला आहे.यातील काही डॉक्टरांनी मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. पुन्हा रेखावार यांनी आश्वासन दिले आहे. मात्र, याबाबत काहीही ठोस निर्णय झालेला नाही. दुसरीकडे यातील दोन, तीन डॉक्टरांचे चार महिन्यांचे कंत्राट संपत आले आहे.

पुन्हा नवीन आदेश घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना लेखी हमीपत्र देण्यास सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये पगार वेळेवर मिळाला नाही तर तक्रार करणार नाही, असे लेखी द्यावे लागणार आहे.हमीपत्राचा नमुनाकंत्राटी सेवा १० च्या उद्दिष्टांतर्गत अनुदान प्राप्त झाल्यानंतर मला वेतन व भत्ते अदा करण्यात येतील याची मला पूर्ण कल्पना आहे. अनुदान उपलब्ध होण्यास विलंब झाल्यास माझे वेतन व भत्ते वेळेत न मिळाल्यास याबाबत कोणतीही तक्रार मी करणार नाही. अनुदान उपलब्ध झाल्यानंतर मला वेतन अदा करण्यास माझी कोणतीही हरकत नाही. वेतन मिळण्याबाबत कार्यालयाकडे मी वारंवार विचारणा करणार नाही, अशी हमी देत आहे.अजित पवारांचे आश्वासन गेले वाहूनदहा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. ज्यावेळी डॉक्टरांना चार महिने कोरोना काळात काम करत असतानाही पगार नाही असे सांगितले तेव्हा त्यांनी चारच दिवसात पगार होतील, अशी ग्वाही दिली होती; परंतु मधल्या आलेल्या महापुरात पवारांचे आश्वासन वाहून गेले. कारण जुलै पाचवा महिना संपला तरी या डॉक्टरांना पगार मिळालेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयdocterडॉक्टरkolhapurकोल्हापूर