मोदींची सभा होणारच

By Admin | Updated: October 1, 2014 01:17 IST2014-10-01T01:16:27+5:302014-10-01T01:17:26+5:30

चंद्रकांत पाटील : शनिवारी आयोजन; मान्यवरांची उपस्थिती

Will Modi's meeting be held? | मोदींची सभा होणारच

मोदींची सभा होणारच

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची येत्या शनिवारी (दि. ४) कोल्हापुरातील तपोवन मैदानावर होणारी जाहीर सभा निश्चित असल्याची माहिती भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज, मंगळवारी दिली.
आमदार पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेहून ते दिल्ली येथे येतील. त्यानंतर ते कोल्हापूरला सभेसाठी येणार आहेत. तत्पूर्वी ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. कोल्हापुरात आल्यावर सभेपूर्वी ते अंबाबाईचेही दर्शन घेतील. सकाळी १० किंवा दुपारी दोन वाजता सभा होईल. सभेला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी, प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यात २२ ठिकाणी मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत. एका दिवसात चार याप्रमाणे याचे नियोजन आहे. कोल्हापुरातील सभेनंतर ते बीडला जाणार आहेत.
पाटील पुढे म्हणाले, मोदी यांची ही सभा कोल्हापुरातील ऐतिहासिक सभा होणार आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, बाबा देसाई, के. एस. चौगुले, अशोक देसाई, अ‍ॅड. संपतराव पवार, भगवान काटे, आदी उपस्थित होते.

Web Title: Will Modi's meeting be held?