पदयात्रा यशस्वी करणार , रुकडी येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST2021-09-02T04:52:27+5:302021-09-02T04:52:27+5:30
रुकडी माणगाव : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर प्रयाग चिखली ते नृसिंहवाडीपर्यत निघणारी ...

पदयात्रा यशस्वी करणार , रुकडी येथे बैठक
रुकडी माणगाव : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर प्रयाग चिखली ते नृसिंहवाडीपर्यत निघणारी ‘आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ या पदयात्रेस सर्वांनी गट-तट विसरून यात्रा यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन रूकडी येथे झालेल्या स्वभिमानीच्या बैठकीत करण्यात आले. ही बैठक रुकडी येथील जवाहर सहकारी पतसंस्थेत पार पडली. दरम्यान, दिनांक ३ सप्टेंबर रोजी रूकडी येथे येणाऱ्या या पदयात्रेचे जोरदार स्वागत करणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे नेते व माजी सरपंच किरण भोसले यांनी दिली.
बैठकीस पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, ॲड. सुरेश पाटील, रावसाहेब पाटील, महादेव कोळी, ग्रा. पं. सदस्य विजय पाटील, संजय नांद्रे, शीतल देसाई, अनिकेत देसाई यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.