तळसंदेच्या विकासासाठी मदत करणार : आमदार डॉ. विनय कोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:07+5:302021-02-09T04:26:07+5:30
नवे पारगाव : नागनाथ मंदिर, विष्णू तलावातील श्रीकृष्ण मंदिराचे बांधकाम व गावच्या विकासासाठी लागेल ती मदत करु, अशी ग्वाही ...

तळसंदेच्या विकासासाठी मदत करणार : आमदार डॉ. विनय कोरे
नवे पारगाव : नागनाथ मंदिर, विष्णू तलावातील श्रीकृष्ण मंदिराचे बांधकाम व गावच्या विकासासाठी लागेल ती मदत करु, अशी ग्वाही आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथे नागनाथ मंदिराचा पायाभरणी समारंभ व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सत्कार वारणेचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ. कोरे बोलत होते. यावेळी माजी उपसरपंच मनोहर चव्हाण, किरण मोहिते, माजी सरपंच अँड. दौलतराव मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले.
विजयसिंह घाटगे यांना डी. वाय. एस. पी. पदावर बढती मिळाल्याबद्दल, सावित्री चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल, शारदा मोहिते यांना ‘उद्योग श्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल, प्रकाश चरणे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल तसेच शिक्षक उदय मोहिते, प्रज्ञा पाटील या सर्वांचा सत्कार आमदार डॉ. कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला सरपंच अमरसिंह पाटील, संग्रामसिंह शिंदे, सदस्य शिवाजी पाटील, प्रकाश कोळी, राजेंद्र शिंदे, सुनीता चव्हाण, विजया चव्हाण, सुधा कांबळे, शांताबाई पाटील, जयश्री संकपाळ, मनिषा संकपाळ, जीवनकुमार शिंदे, सचिन कोलुलकर, भिकाजी चव्हाण उपस्थित होते.
०८ पारगाव
फोटो ओळी : तळसंदे येथील डी. वाय. एस. पी. विजयसिंह घाटगे यांचा सत्कार आमदार डॉ. विनय कोरे यांनी केला. यावेळी दौलतराव मोहिते, प्रकाश चरणे उपस्थित होते.