शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

मराठा समाजासाठी शक्य ते सर्व करु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही; अभिनंदनासाठी कोल्हापूरकरांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:05 IST

शिंदे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले

कोल्हापूर : मराठा समाजासाठी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले; परंतु महाविकास आघाडीला ते टिकवता आले नाही. त्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर खास अधिवेशन घेऊन १० टक्के आरक्षण दिले. त्याविरोधात आघाडीचेच काहीजण न्यायालयात गेले ही वस्तुस्थिती आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजासाठी अनेक योजना गेल्या दहा वर्षांत सुरू करून त्या कार्यरत आहेत. त्यामुळे मराठा समाजासाठी शक्य आहे ते सर्व केले आहे आणि यापुढेही करणार आहोत, अशी नि:संदिग्ध ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.शिंदे यांनी शनिवारी दुपारी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, उदय सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीदरम्यान कोल्हापूरला आलो होतो. महायुती विजयी झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येतो, असे मी जाहीर सभेत बोललो होतो. त्यानुसार आज दर्शन घेतले. अंबाबाईचा मोठा आशीर्वाद आम्हांला मिळाला आणि आम्ही मोठ्या पाठिंब्याने सत्तेवर आलो. यावेळी अर्जुन आबिटकर, रवींद्र माने, सुजित चव्हाण उपस्थित होते.

शिंदे म्हणाले

  • पात्र लाडक्या बहिणींच्या योजनेत खंड पडणार नाही.
  • महाविकास आघाडीला जनतेने जागा दाखवून दिली.
  • बदलापूर प्रकरण न्यायालयात, त्यावर बोलणार नाही.
  • एस.टी.च्या चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेवाढ
  • दावोसमध्ये याआधीही चांगली गुंतवणूक झाली आहे. आता तर देशाच्या ५२ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

अभिनंदनासाठी झुंबडविधानसभा निवडणुकीच्या यशानंतर शिंदे यांचा हा पहिलाच दौरा होता. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. त्यामध्ये राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील शिवसैनिकांची संख्या लक्षणीय होती. शिंदे मंदिरात जाताना आणि येताना अक्षरश: चेंगराचेंगरी झाली. अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षण