शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्तर’मधून निवडणूक लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:53 IST

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे मी समाजकारण करत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते ...

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे मी समाजकारण करत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी मंगळवारी येथे केली.शाहू स्मारक भवन येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुळीक यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसला प्राधान्य देणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र तेथून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून उतरण्यासही मागे-पुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले.मुळीक म्हणाले, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेली तीस वर्षे मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाचे संघटन करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मराठा समाजाचे प्रश्न मांडतानाही सातत्याने इतर सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या बळावर निवडणुकीला सामोरे जावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रथम काँग्रेसकडून तिकीट मागावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आमचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.’इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘सरकारकडून जनतेची फसवणूक होत आहे. प्रतिगाम्यांचे विचार रोखायचे असतील तर मुळीक यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे.मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी म्हणाले, ‘समाजकार्यातून वसंतराव हे तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. फक्त संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सुटत नाही, तर ते मार्गी लावण्यासाठी राजकारणात यावे लागते. राजकीय सत्ताही महत्त्वाची आहे.’शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. उत्तम जाधव यांनी आभार मानले. यावेळी आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, ख्रिश्चन समाजाचे अनंत म्हाळुंगेकर, अनिल पाटील, अमरसिंह पाटील, छावा संघटनेचे किसन लोहार, उत्तम कांबळे, डॉ. संदीप पाटील, मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.एक व्होट एक नोटचा नारागेली ३० वर्षे समाजकार्यात असलेला सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो, हे आपण दाखवून दिले पाहिजे. ‘एक नोट-एक व्होट’ याप्रमाणे मुळीक यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहन बबन रानगे यांनी केले.