'स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार'; संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण

By भारत चव्हाण | Published: February 18, 2024 12:49 PM2024-02-18T12:49:13+5:302024-02-18T12:49:32+5:30

कोणत्याही पक्षात प्रवेश नाही

'Will contest election through Swarajya Party'; Explanation by Chhatrapati Sambhaji Raje | 'स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार'; संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण

'स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार'; संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसून, आपण स्वत: स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच आगामी लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे.

संभाजीराजे छत्रपती महाविकास आघाडीच्या कोणत्या तरी एका घटक पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणार या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे जरी स्वराज्य पक्षातच राहणार असले तरी, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून स्वराज्य पक्ष मात्र महाविकास आघाडीचा घटक होऊ शकतो, हे त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.

स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर की नाशिक यापैकी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

Web Title: 'Will contest election through Swarajya Party'; Explanation by Chhatrapati Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.