शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

लहरी हवामानामुळे काजूचे उत्पादन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:21 IST

कडगाव : सतत बदलणाऱ्या व शेतकऱ्याला सुद्धा न समजणाऱ्या हवामान बदलाचा विपरीत परिणाम भुदरगडच्या पश्चिम भागातील काजू पिकावर झाल्याने ...

कडगाव : सतत बदलणाऱ्या व शेतकऱ्याला सुद्धा न समजणाऱ्या हवामान बदलाचा विपरीत परिणाम भुदरगडच्या पश्चिम भागातील काजू पिकावर झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत निम्मे उत्पादन तरी हाताला लागेल का? असा प्रश्न काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काजू उत्पादन घटल्यामुळे काजूबियांच्या पहिल्या आवकेलाच शेतकऱ्यांना तेजीतील दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान आहे. येत्या काही दिवसांत काजू बियांचा दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने व पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीमुळे असेल तसा आणि मिळेल तेवढ्या काजूबिया मिळविण्यासाठी व्यापारी स्पर्धा करीत आहेत.

तळ कोकणाला लागून असणाऱ्या भुदरगडच्या पश्चिम भागात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यंदा वातावरणातील बदलामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात काजू झाडांना असलेल्या बहरामुळे यंदा काजूचे उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता काजू उत्पादकांनी व्यक्‍त केली होती. मात्र, वातावरणात होत असणाऱ्या बदलामुळे व अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे काजूच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे सध्या काजू बीचा किलोचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. तो दीडशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

पारंपरिक शेती व्यवसायातून कसेबसे भागवणाऱ्या शेतकऱ्याला ऊस व भात या पारंपरिक पिकांबरोबरच काजूच्या उत्पन्नाची जोड मिळाली आहे. यंदा जर काजू बियांना चांगला दर मिळाला तर काजू उत्पादकांची आर्थिक घडी सावरण्यात थोडी मदत होऊ शकते.

या वर्षी काजू उत्पादनामध्ये झालेली घट यामुळे काजू उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आला असून ज्या पद्धतीने कापूस, ऊस, कांदा यासारख्या पिकांना शासनाकडून अनुदान दिले जाते या पद्धतीने काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी.

शशिकांत पाटील,सामाजिक कार्यकर्ते, तिरवडे, ता. भुदरगड

भुदरगड-आजरा परिसरातील काजूबियांचा दर्जा उच्च प्रतीचा आहे. या तुलनेत परदेशातून आयात केलेल्या बिया चवीच्या दृष्ट‌ीने अत्यंत सुमार दर्जाच्या असतात. कमी दरामुळे परदेशी काजूची आवक वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह छोट्या स्थानिक उद्योजकाचे गणित बिघडत आहे.

सुरेश शेवाळे नागनवाडी, काजू व्यापारी

फोटो:काजू