शालिनी स्टुडिओचा अंत होत असताना हेरिटेज कमिटी गप्प का होती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:21+5:302021-07-14T04:27:21+5:30

कोल्हापूर : जागतिक चित्रपटसृष्टीत सिंहाचा वाटा असणाऱ्या कोल्हापुरातील हेरिटेज वास्तूपैकी शालिनी स्टुडिओचे बांधकाम व्यावसायिकांकडून अस्तित्व संपवले. ऐतिहासिक वास्तू ...

Why was the Heritage Committee silent when Shalini Studio was coming to an end? | शालिनी स्टुडिओचा अंत होत असताना हेरिटेज कमिटी गप्प का होती ?

शालिनी स्टुडिओचा अंत होत असताना हेरिटेज कमिटी गप्प का होती ?

कोल्हापूर : जागतिक चित्रपटसृष्टीत सिंहाचा वाटा असणाऱ्या कोल्हापुरातील हेरिटेज वास्तूपैकी शालिनी स्टुडिओचे बांधकाम व्यावसायिकांकडून अस्तित्व संपवले. ऐतिहासिक वास्तू वारसास्थळांच्या संवर्धन आणि जपणुकीसाठी शासनाने नेमलेल्या कोल्हापूर हेरिटेज समितीने हा स्टुडिओ वाचविण्यासाठी आपली नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्यक्षात काय प्रयत्न केले, याचा जाहीर खुलासा करावा, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

पत्रकात म्हटले आहे, सन २०१९ सालाच्या संरक्षित वास्तूच्या म्हणजेच हेरिटेज यादीत असणारा ऐतिहासिक शालिनी स्टुडिओ अचानक या यादीतून गायब कसा झाला याचे गौडबंगाल काय आहे ? कोल्हापूरच्या वारसास्थळातील शताब्दी वर्ष पूर्णत्वाकडे असणारा हा स्टुडिओ त्याचे अस्तित्व संपवून बिल्डर लॉबीच्या ताब्यात गेला. त्यास कोल्हापूरच्या हेरिटेज समितीने मदत केल्याची कोल्हापूरकरांना शंका येत आहे.

एरवी इतर विकासकामे होत असतील तर कागदी घोडे नाचवून खोट्या निनावी तक्रारी दाखल करून विकासकामात खोडा घालणारी हेरिटेज कमिटी शालिनी स्टुडिओचा अंत होत असताना गप्प का होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा शहर नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोटके, चंद्रकांत पाटील, अजित सासणे, चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद डुणुंग, लहुजी शिंदे, राजेश वरक, शंकर शेळके, पंपू सुर्वे, प्रमोद पुंगावकर यांनी पत्रक काढले आहे.

चौकट

बिल्डरचे हस्तक आहेत का ?

कोल्हापूरच्या दृष्टीने हेरिटेज कमिटी बिनकामाची आहे. अशा समितीने जनतेपुढे शालिनी स्टुडिओसंबंधी जाहीर खुलासा करावा. समितीचे सदस्य बिल्डर समितीचे हस्तक आहेत का हेही सांगावे, अशी मागणी समितीने केली आहे.

Web Title: Why was the Heritage Committee silent when Shalini Studio was coming to an end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.