इतकी जीवघेणी घाई कशासाठी...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST2021-09-12T04:27:38+5:302021-09-12T04:27:38+5:30
फोटो फिचर... कोल्हापूर शहरातील प्रमुख चौकात सुमारे ८० टक्के वाहने ही झेब्रा क्राॅसिंगच्या अलीकडे उभारतात, तर काही वाहनधारकांना नेहमीच ...

इतकी जीवघेणी घाई कशासाठी...?
फोटो फिचर...
कोल्हापूर शहरातील प्रमुख चौकात सुमारे ८० टक्के वाहने ही झेब्रा क्राॅसिंगच्या अलीकडे उभारतात, तर काही वाहनधारकांना नेहमीच जीवघेणी घाई असते. त्यामुळे रेड सिग्नल सुरू असला तरीही तो चालक आपले वाहन झेब्रा क्रॉसिंगवर उभा करतात व ग्रीन सिग्नल दाखवण्यापूर्वीच यलो सिग्नल पडताच चालक वाहने पुढे रेटतात. अनेकवेळा चौकातील वाहतूक पोलिसालाही वाहनांच्या गर्दीमुळे काहीवेळा बघ्याची भूमिका घ्यावी लागते. (सर्व फोटो आदित्य वेल्हाळ)
फोटो नं.११०९२०२१-कोल-सिग्नल०१
ओळ : व्हीनस चौकात सिग्नल तोडणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे.
फोटो नं.११०९२०२१-कोल-सिग्नल०२,०३
ओळ : सिग्नल पडल्यानंतर झेब्रा क्रॉसिंगवर थांबणाऱ्यांचे सुमारे १० टक्के प्रमाण आहे. आर्यविन ख्रिश्चन हायस्कूल चौकातील दृश्य.
फोटो नं.११०९२०२१-कोल-सिग्नल०४
ओळ : मध्यवर्ती बसस्थानक या महत्त्वाच्या दाभोळकर कॉर्नर चौकातही पोलीस असूनही सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
फोटो नं.११०९२०२१-कोल-सिग्नल०५
ओळ : सिग्नल तोडल्यानंतर कारवाई ही होणारच! दाभोळकर चौकात वाहनांची नेहमीच कोंडी होते, तेथे सिग्नल तोडणाऱ्याला कारवाईच्या सामोरे जावे लागत आहे.