आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले आहे. नेसरी ता. गडहिंग्लज येथे बुधवारी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. राजकीय वर्तुळातून आरोप झाले. काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी केली, यावर आता खासदार संजय मंडलिक यांनी पलटवार केला आहे.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, मी काल नेसरीत बोलताना कुस्तीचं उदाहरण दिलं, यात आता समोरच्या उमेदवाराचं काय आहे हे सांगितलं पाहिजे, यासाठी मी बोलताना म्हणालो होतो की, छत्रपती शाहू महाराज खरे वारसदार नाहीत. यावेळी माझा फक्त एक शब्द चुकला. मला एवढच म्हणायचं होतं की आताचे छत्रपती शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत. ते दत्तक वारसदार आहेत, जे म्हणालो ते काही कपोकल्पित नाही, वृत्तपत्रात लेख आला आहे. याबाबत एका पुस्तकही हा उल्लेख आहे, इतिहास माहित नसणारे राजकारणात आहेत. तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिक यांनी माफी मागावी म्हणतात, त्यांनी थेट असेल तर त्यांनी सिद्ध करावं, यात माझ काही चुकलं असेल तर मी माफी मागेन, असंही संजय मंडलिक म्हणाले.
शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार, संजय मंडलिकांच्या वक्तव्याने खळबळ
थेट वारसदार तुम्ही, आम्ही आहोत हा विचार माझा आहे. "अनेक चॅलेनवर प्रतिक्रिया देऊन त्यांनी आरोप केले. या मंडळींना संजय मंडलिकांचं चुकलं असं सांगत होता. या मंडळींना मी विचारु शकतो की शाहू महाराज दत्तक आहेत की नाही याच उत्तर द्या. दत्तक असाल तर दत्तक कायदेशीर झालंय की नाही याचही उत्तर द्या आणि यामध्ये कशाचा अपमान झालाय याचही उत्तर द्या, असा पलटवार खासदार संजय मंडलिक यांनी केला.