कार्यालयाकडे जाण्यासाठी तत्काळ रस्ता, सर्व्हिस रोड का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST2021-04-27T04:23:32+5:302021-04-27T04:23:32+5:30
उचगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी (ता. करवीर) येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे नव्याने कार्यालय झाले आहे. या ...

कार्यालयाकडे जाण्यासाठी तत्काळ रस्ता, सर्व्हिस रोड का नाही?
उचगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी (ता. करवीर) येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे नव्याने कार्यालय झाले आहे. या कार्यालयाकडे जाण्यासाठी-येण्यासाठी रस्ता झाला. पण, गेली अनेक वर्षे याच परिसरातील महामार्गावरील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड अद्याप झाले नाहीत. कार्यालयाकडे जाण्या-येण्यासाठी रस्ता होतो, पण सर्व्हिस रोड का होत नाहीत, असा सवाल उपस्थितीत होत आहे.
येथील मयूर पेट्रोल पंप ब्रिज ते उजळाईवाडी विमानतळ रोड ब्रिज, पसरीचा नगर, महालक्ष्मी नगर, गोखले कॉलनी, पाटबंधारे कॉलनी, समर्थ मंगल कार्यालयापर्यंत सर्व्हिस रोड करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या परिसरातील नागरिकांनी याबाबत मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महामार्गावरील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची आणि महामार्गाच्या साईटपट्ट्यासह सर्व्हिस रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याकडे मात्र कानाडोळा करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात सर्व्हिस रस्तेही करण्याची मागणी येथील जनतेतून होत आहे.
फोटो : २६ उजळाईवाडी सर्व्हिस रस्ता
ओळ:- पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी (ता. करवीर) येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे नव्याने कार्यालय झाले आहे. कार्याकडे जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता झाला; पण सर्व्हिस रस्ते वर्षानुवर्षे मागणी करून झाले नाहीत.