शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कुस्ती मॅटबाबत गुन्हा का दाखल केला नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 10:46 IST

तक्रार होऊन काही महिने झाले. तुम्ही शिंगणापूर शाळेतील बोगस कुस्ती मॅटबाबत कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही? असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना केला.

ठळक मुद्देबोगस कुस्ती मॅटबाबत गुन्हा का दाखल केला नाही?शौमिका महाडिक यांनी झापले, जिल्हा परिषद स्थायी सभा

कोल्हापूर : तक्रार होऊन काही महिने झाले. तुम्ही शिंगणापूर शाळेतील बोगस कुस्ती मॅटबाबत कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही? असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना केला.स्थायी समितीची सभा बुधवारी दुपारी समिती सभागृहात झाली. यामध्ये या विषयावर अर्धा तास घमासान झाले. अखेर उबाळे यांनी ‘फौजदारी गुन्हा दाखल करते,’ असे सांगितल्यानंतर या विषयावर पडदा पडला.बैठकीदरम्यान महाडिक यांनी स्वत: कुस्ती मॅटबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तुम्ही श्ािंगणापूर शाळेत गेला का? मॅटची पाहणी केली का? तो दर्जा तुम्हाला योग्य वाटला का? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत महाडिक यांनी ‘गुन्हा का दाखल केला नाही?’ अशी विचारणा केली. सदस्य राहुल आवाडे यांनीही ‘तुम्ही आतापर्यंत गप्प का बसलात?’ असे विचारले.सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी दुरुत्तरे करणाऱ्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक ए. आर. जाधवर यांना निलंबित केल्याशिवाय पुढच्या सर्वसाधारण सभेला बसणार नसल्याचे यावेळी सांगितल्यानंतर त्यांना निलंबित करण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अमन मित्तल यांनी दिली.यावेळी मित्तल यांनी पुराच्या काळात जिल्हा परिषदेचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगून त्याबाबतचे सविस्तर सादरीकरण केले. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत असून तातडीने डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी गटनेते अरुण इंगवले यांनीही चर्चेत भाग घेतला.यावेळी जिल्हा परिषदेकडे नव्याने रुजू झालेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे आणि निरंतर शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांचे स्वागत करण्यात आले.बैठकीला उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती अंबरीश घाटगे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, वंदना मगदूम, सदस्य जयवंतराव शिंपी, युवराज पाटील, कल्लाप्पा भोगण, संध्याराणी बेडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर