कुंभोज सरपंचपदी वर्णी कोणाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:06+5:302021-02-05T07:02:06+5:30
कुंभोज : येथील ग्रामपंचायतीच्या ...

कुंभोज सरपंचपदी वर्णी कोणाची?
कुंभोज : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून महाविकास आघाडीच्या चार महिला सदस्या दावेदार असून, आघाडी सरपंचपदी प्रथम कोणाला संधी देणार याबाबत नागरिकांत उत्सुकता पसरली आहे. तथापि, उपसरपंच पदासाठी सध्यातरी रस्सीखेच दिसून येत नसून दाविद घाटगे यांचे नाव चर्चेत आहे. सुरुवातीस आठ संख्याबळ असलेल्या महाविकास आघाडीला प्रथम दाविद घाटगे, जयश्री महापुरे, तर नुकताच अजित देवमोरे तसेच अमरजित बंडगर या अपक्षांनी पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ आता बारा झाले आहे. लोकविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना यश आले नसल्याने महाविकास आघाडीची सत्तास्थापनेची वाट आता एकदम सुकर झाली आहे. आघाडीअंतर्गत पाच वर्षांत सरपंचपदासाठी दावेदार असणा-या जयश्री जाधव, अरुणादेवी पाटील, स्मिता चौगुले, माधुरी घोदे या सर्वांना सरपंच पदाची संधी देऊन तितकेच उपसरपंच करण्याची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. सरपंचपदी पहिल्यांदा संधी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय आघाडी प्रमुखांच्या बैठकीत लवकरच होईल. तोपर्यंत नागरिकांतून भावी सरपंच निवडीबाबत चर्चा सुरू झाली असून तेवढीच उत्सुकताही लागून राहिली आहे.