शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रुग्णांना गर्भलिंग निदानासाठी पाठवणारा डॉ. युवराज निकम गजाआड

By उद्धव गोडसे | Updated: February 14, 2024 15:30 IST

कोकणातून रुग्ण पाठवले, औषध पुरवठादारांचा शोध सुरू

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सुलोचना पार्कमध्ये घरात थाटलेल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्राकडे रुग्णांना पाठवणा-या डॉक्टरला वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथून करवीर पोलिसांनी अटक केली. युवराज विलास निकम (वय ३४, सध्या रा. वैभववाडी, मूळ रा. म्हालसवडे, ता. करवीर) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. या गुन्ह्यात अटक झालेला हा सातवा संशयित आरोपी आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.मुलगा होण्याचे औषध देण्याची जाहिरात सोशल मीडियात करून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणा-या रॅकेटचा भांडाफोड १६ जानेवारीला झाला होता. आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर करवीर पोलिस रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचत आहेत. बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) याच्यासह सहा जणांना अटक झाली होती.यातील सातवा संशयित डॉ. युवराज निकम याला पोलिसांनी मंगळवारी (दि. १३) रात्री वैभववाडी येथील त्याच्या दवाखान्यातून अटक केली. त्याने कोकणातील काही रुग्णांना गर्भलिंग तपासणीसाठी सुलोचना पार्क येथे पाठवले होते. एजंट म्हणून काम करताना त्याला प्रत्येक रुग्णामागे १० ते २० हजार रुपये मिळाले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. गर्भपाताची औषधे पुरवणारी एक महिला मेडिकल चालक पोलिसांच्या रडारवर आहे. तिलाही लवकरच अटक होईल, अशी माहिती निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPregnancyप्रेग्नंसीAbortionगर्भपातdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी