मुख्यमंत्र्यांचे नाव घेणारे --काय करतात, ते पाहाच !

By Admin | Updated: August 1, 2014 23:18 IST2014-08-01T21:19:12+5:302014-08-01T23:18:02+5:30

रामराजे यांची विरोधकांवर टीका

Who is the name of Chief Minister - what he does, see! | मुख्यमंत्र्यांचे नाव घेणारे --काय करतात, ते पाहाच !

मुख्यमंत्र्यांचे नाव घेणारे --काय करतात, ते पाहाच !

फलटण : ‘फलटण तालुक्यात डोकी फोडण्याचे राजकारण आपण १९९५ साली बंद केले असून, आता पुन्हा काही प्रवृत्ती तसेच राजकारण करू पाहत आहेत. अशा प्रवृत्तीचा वेळीच बिमोड करा,’ असे प्रतिपादन रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
कुरवली, ता. फलटण येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, दूध संघाचे चेअरमन एच. आर. जाधव, भीमदेव बुरुंगले, उपसभापती विवेक शिंदे, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, मोहनबुवा निंबाळकर, माजी सभापती रामभाऊ ढेकळे आदी मान्यवर उपस्थित होते. रामराजे म्हणाले, ‘या वेळेला राज्यात आघाडीचे काही व्हायचे ते होऊ द्या. तालुक्यात सरळ-सरळ लढत होऊन जाऊ द्या. ‘उगीच छावणी पाहिजे, मुख्यमंत्र्यांना सांगतो, ग्रामसेवक, तलाठी यांची बदली पाहिजे, असे म्हणणारे हीच मंडळी मुख्यमंत्र्यांबरोबर राहतात का नाही, हे एक-दीड महिन्यात समजेल.’याप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, एल. आर. जाधव, भीमदेव बुरुंगले, अप्पासो तोडकर यांची भाषणे झाली. सरपंच बापूराव घनवट यांनी स्वागत केले. राजेंद्र गोळे यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच जया गोळे यांनी आभार मानले.कार्यक्रमास दादासो निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर अनिल तोडकर, सुधीर गोळे, ग्रामसेवक गणेश दडस, महादेव घनवट, हेमंत गोळे, सोमनाथ गोडसे, सुरेश रोमन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Who is the name of Chief Minister - what he does, see!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.