शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

गांधीनगर पाणी योजनेचे श्रेय घेणारे क्षीरसागर कोण..? आमदार ऋतुराज पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 14:13 IST

या योजनेला निधी मंजूर झाल्याची माहिती देऊन त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राजेश क्षीरसागर करत आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगरसह वीस गावांसाठीच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट केलेल्या सर्व गावांतील लोकांशी चर्चा करूनच या योजनेबाबत निर्णय घेणे संयुक्तिक ठरणार आहे. या योजनेला अद्याप कोणतीही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही; पण या योजनेला निधी मंजूर झाल्याची माहिती देऊन त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राजेश क्षीरसागर करत आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील या पाणीयोजनेचे श्रेय घेणारे क्षीरसागर कोण ? त्यांचा या योजनेशी काय संबंध ? अशी विचारणा आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी केली.

क्षीरसागर यांनी आपल्या पाठपुराव्यामुळे १३७ कोटींची ही योजना मंजूर होऊन त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे माध्यमांना सांगितले आहे. वास्तविक या योजनेत समाविष्ट सर्व २० गावांनी अद्याप याबाबत मान्यता दिलेली नाही. मग ती योजना मंजूर कशी होईल? त्याला निधी कसा उपलब्ध होईल? तसेच मी प्रतिनिधित्व करणाऱ्या दक्षिण मतदारसंघातील पाणी योजनेला निधी मंजुरीची जाहीर घोषणा करण्याची घाई क्षीरसागर यांना का झाली आहे? असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार पाटील म्हणतात, राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतून कोल्हापूर दक्षिण मतदासंघातील गांधीनगरसह उचगाव, पाचगाव, मुडशिंगी, वळीवडे, वसगडे, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगाव उजळाईवाडी, आदी २० गावांसाठी सुधारित पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील तसेच मी स्वतः पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली; पण योजनेत समाविष्ट वीस गावांपैकी नेर्ली, तामगाव, कणेरीवाडी, सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, चिंचवाड, वसगडे या आठ गावांतील लोकांनी या योजनेत समाविष्ट होण्यास नकार दिला आहे.या योजनेची पाणीपट्टी आम्हाला परवडणार नाही. योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक सात कोटी खर्च येणार आहे, असे या गावातील लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व २० गावांतील लोकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन पुढील पाऊल टाकणे अपेक्षित आहे. ही चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात पालकमंत्री सतेज पाटील व मी या सर्व गावांतील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांची बैठक घेण्याचे नियोजन केले आहे.

श्रेयवाद थांबवावा

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष समाविष्ट आहेत, याची क्षीरसागर यांनी जाणीव ठेवावी. त्यामुळे श्रेयवादाचे राजकारण त्यांनी थांबवावे, असेही आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRuturaj Patilऋतुराज पाटीलRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर