शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार ? : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:07 IST

सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रीमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत सुटलेत. याला उध्दवच एक दिवस कंटाळतील, कारण पवार हेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार हेच कळत नसल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  मंगळवारी लगावला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार ? : चंद्रकांत पाटीलभाजपच्यावतीने कर्जमुक्ती योजनेतील अटींविरोधात कोल्हापुरात धडक मोर्चा

कोल्हापूर : सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रीमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत सुटलेत. याला उध्दवच एक दिवस कंटाळतील, कारण पवार हेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार हेच कळत नसल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  मंगळवारी लगावला.कोल्हापूर जिल्हा भाजपच्यावतीने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील निकष आणि अटींविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. चोरून सत्तेवर आलेल्या या सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही. या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा होणार नाही. त्यामुळे चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर आणण्याणासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. सरकारला जाग येत नसल्यानेच शाहू महाराजांच्या कोल्हापूरातून आम्ही हा आवाज उठवला आहे.

या योजनेमध्ये पीककर्जाचा उल्लेख केल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या, बँका आणि पतसंस्थांचे कर्ज काढलेल्या, मायक्रो फायनान्सचे,भूविकासचे कर्ज काढलेल्या अशा कोणत्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नाही. २0१९/२0 या वर्षातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश नाही. म्हणूनच आम्ही सरसकट कर्जमाफीचा आग्रह धरत आहोत.मोर्चाचे संयोजक भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांनी गुन्हा केला असल्यासारखे त्यांना या योजनेतून वगळले आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या २५ हजार रूपये पगार असणाऱ्या मुलांना या योजनेचा फायदा नाही.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक,सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांची यावेळी भाषणे झाली. यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, अमल महाडिक, हिंदूराव शेळके,महेश जाधव, राहूल चिकोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर