महापुरातील मदत कार्याबद्दल ‘व्हाईट आर्मी’चा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:30 IST2021-08-17T04:30:53+5:302021-08-17T04:30:53+5:30
कोल्हापूर : रत्नागिरी, चिपळूण शहरांमध्ये आलेल्या महापुरात मदत कार्य केलेल्या व्हाईट आर्मीच्या टीमचा सत्कार रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल ...

महापुरातील मदत कार्याबद्दल ‘व्हाईट आर्मी’चा सत्कार
कोल्हापूर : रत्नागिरी, चिपळूण शहरांमध्ये आलेल्या महापुरात मदत कार्य केलेल्या व्हाईट आर्मीच्या टीमचा सत्कार रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन रविवारी करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पोलीस परेड ग्राऊंड (रत्नागिरी) येथे घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मोहित कुमार गर्ग आदी उपस्थित होते.
महापुराच्या परिस्थितीत ‘व्हाईट आर्मी’च्यावतीने दोन रेस्क्यू बोटद्वारे मदतकार्य करण्यात आले. त्यामध्ये वैद्यकीय सेवा मुराद पुरा, शंकरवाडी, कळंबस्ते बापट आळी गावांमध्ये पुरविण्यात आली. विनायक भाट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बापट आळी, गौतमेश्वर मंदिर, मारुती मंदिर, खेरडी एमआयडीसी, मफतलाल नगरमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शंकरवाडी येथील रमेश कदम यांच्या घरी साचलेला गाळ स्वच्छ करून देण्यात आला. त्यात ‘व्हाईट आर्मी’चे सुधीर गोरे, केतन मात्रे, आकांक्षा पाटील, सुमित साबळे, मृणाल राऊत, सुभान बागवान, अक्षय मगदूम, ऋषिकेश श्रीखंडे, प्रकाश खानिटकर, सलीमोंन आवळे, आदिनाथ कांबळे यांनी सहभाग नोंदविला. वैद्यकीय पथकात डॉ. अमोल कोडोलीकर, सुरेश शेलार, दीपक पवार, शर्वरी रोकडे, ओजस पवार, आयशा राऊत, अमन राऊत, मुकुंद सोनले, रेश्मा कोंडेकर, अनिल पेटकर यांचे सहकार्य लाभले.
फोटो (१६०८२०२१-कोल-व्हाईट आर्मी) : रत्नागिरी, चिपळूण शहरातील महापुरावेळी मदत कार्य केलेल्या कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीच्या टीमचा सत्कार रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते रविवारी रत्नागिरी येथे करण्यात आला.
160821\16kol_6_16082021_5.jpg
फोटो (१६०८२०२१-कोल-व्हाईट आर्मी) : रत्नागिरी, चिपळुण शहरातील महापुरावेळी मदत कार्य केलेल्या कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीच्या टीमचा सत्कार रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते रविवारी रत्नागिरी येथे करण्यात आला.