कुजबुज - महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:28 IST2021-08-28T04:28:10+5:302021-08-28T04:28:10+5:30

गेले काही दिवस झाले महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयात सन्नाटा आहे. विभागीय कार्यालयांची अवस्था तर त्यापेक्षाही वाईट आहे. विठ्ठल रामजी ...

Whispers - Municipal Corporation | कुजबुज - महापालिका

कुजबुज - महापालिका

गेले काही दिवस झाले महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयात सन्नाटा आहे. विभागीय कार्यालयांची अवस्था तर त्यापेक्षाही वाईट आहे. विठ्ठल रामजी शिंदे चौकात वाहनांची गर्दी, कामानिमित्त येणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ, लगबग हे तसे नेहमीचे चित्र! परंतु सगळं कसं शांत आहे. नागरीकांचं येणंही कमी झालं आहे. अमूक एक अधिकारी आहेत का, असं कोणी विचारलं तर दरवाजावरील कर्मचारी सांगतात ... साहेब मिटिंगला गेलेत,वगैेरे वगैरे... संपर्क ठेवणाऱ्या कार्यालयातील अधिकारीसुद्धा बिनसंपर्कात आहेत. अधिकारी भेटत नाहीत. नागरिक येतात आणि परत जातात. एकाने सहज विचारले, का हो अधिकारी, कर्मचारी बरेच जण दिसत नाहीत...’ तेव्हा त्यांना उत्तर दिले, ‘मॅडम रजेवर असल्यामुळे सगळेच निवांत आहेेत’. विचारणाऱ्याला इशारा काफी होता.

(कुजबुज -भारत चव्हाण)

Web Title: Whispers - Municipal Corporation