शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत कमी, अकॅडमीत आम्ही: कायदा धाब्यावर, नियंत्रणही नाही, अधिकाऱ्यांचेही तोंडावर बोट

By समीर देशपांडे | Updated: August 7, 2025 19:07 IST

जिल्हा परिषद शाळांतील पट होवू लागला कमी

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यभर पसरलेल्या या अकॅडमींची ना कुठे नोंदणी आणि ना कुठली परवानगी. त्यामुळे शासनाच्या शाळांमधील पटसंख्या घटताना आणि अकॅडमींचा पसारा वाढताना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही. उलट याच परिस्थितीचा फायदा घेऊन शिक्षणक्षेत्रातीलच अनेकांनी अकॅडमींच्या या वाढत्या व्यवसायात आपलीही भागीदारी निर्माण केल्याच्याही चर्चा जिल्हाभर रंगत आहेत. त्यामुळे शासनमान्य शाळांचीच तपासणी करून कारवाई करणे एवढेच या अधिकाऱ्यांच्या हातात राहिले आहे. मग या अकॅडमींवर नियंत्रण काेणाचे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने निवेदन दिल्यानंतर तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी याबाबत शिक्षण आयुक्तांनाच एक पत्र लिहिले होते. कोल्हापूर जिल्ह्यात अंदाजे १११ हून अधिक अकॅडमी आहेत. ही संख्या अधिकही असण्याचीच शक्यता आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला असून यापुढच्या कार्यवाहीबाबत शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक यांच्याकडूनच सूचना होणे आवश्यक असल्याचे तोंडी सूचित करण्यात आले. ज्या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटिसा काढण्याच्या पलीकडे आता काही काम सुरू नाही. 

धोरणच ठरलेले नाहीअकॅडमीबाबत शिक्षण विभागाचे कोणतेच धोरण ठरलेले नाही. जिल्ह्यातील अनेक अकॅडमींमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी अध्ययन करत आहेत. त्यातील अनेक ठिकाणी नाव शाळेत आणि विद्यार्थी अकॅडमीत असेच चित्र आहे. परंतु शाळा आणि अकॅडमी अशी खातरजमा करण्याबाबत कुठलेच धोरण सध्या नसल्याने अधिकारी कोंडीत सापडले आहेत.

आम्ही सध्या जिल्ह्यातील माध्यमिक शाळांची तपासणी सुरू केली आहे. ३२ शाळांची तपासणी झाली आहे. त्यामध्ये कुठेही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी गैरहजर दिसून येत नाहीत. ज्या ठिकाणी तसे वाटले त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटिसा दिल्या आहेत. - सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

अकॅडमींवर आमचे नियंत्रण नसते परंतु ज्या विद्यार्थ्यांचे दाखले ज्या शाळेत आहेत तो विद्यार्थी त्याच शाळेत शिकला पाहिजे. तो जर अकॅडमीत शिकत असल्याचे सिद्ध झाले तर संबंधित शाळांवर कारवाई होईल. त्यासाठी कोल्हापूर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू केली आहे. - महेश चोथे, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर

जुन्या काळातील शिकवणीला आता क्लासचे स्वरूप आले आहे. प्रामाणिक क्लास संचालक अजूनही शाळा कॉलेजवेळा वगळून क्लास घेत उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, त्यातून गरज म्हणून अकॅडमीचा उदय झाला हे नाकारता येत नाही. इंटिग्रेटेड , टाय अप क्लासेसला संघटनेने पहिल्यापासून विरोध केला आहे . याबाबत आता शासनपातळीवरही कायदा किंवा नियम करण्याच्या हालचाली सुरू आहेत. - प्रशांत कासार, राज्य अध्यक्ष, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य

जिल्हा परिषदांच्या शाळेत विद्यार्थ्याचे नाव आणि विद्यार्थी जर अकॅडमीत असेल तर ज्यांना याबाबत ठोस माहिती आहे त्यांनी शिक्षण विभागाकडे याची माहिती द्यावी. याबाबत उचित कारवाई केली जाईल. - डॉ. मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापू