शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सुषमा अंधारेंची जाहीर सभा, अन् मुस्लिम बांधवांनी दाखवला मनाचा मोठेपणा; सर्वत्र चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 13:22 IST

शिंदे-फडणवीस सरकारसह, कोल्हापूरचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल

कुरुंदवाड : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची काल, मंगळवारी कोल्हापुरात जाहीर सभा झाली. यासभेत अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह, कोल्हापूरचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. यासभेदरम्यान मुस्लिम बांधवांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाची मात्र सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.कुरुंदवाड येथील थिएटर चौकात सुषमा अंधारेंची सभा होती.  सभा असलेल्या चौकात मशिद आहे. दररोज आठ वाजता नमाज पठण होते. सभा सुरू असल्याने ध्वनिक्षेपकावरील नमाज पठणाने सभेत अडथळा नको हे समजून मुस्लिम समाज बांधवांनी ध्वनिक्षेपक बंद ठेवून नमाज पठण केले. मुस्लिम बांधवांचा मनाचा मोठेपणा व सामंजस्यपणा शहरात चर्चेचा विषय होता.या सभेत बोलताना अंधारे म्हणाल्या, खासदार धैर्यशील माने लोकसभा निवडणूकीपूर्वी अडगळीत पडले होते.  निवेदिता माने यांचे शिवसेनेशी विश्वासघातकी राजकारण विसरुन मातोश्री'ने धैर्यशील मानेना लोकसभेची उमेदवारी दिली. शिवसैनिकांनी त्यांना कष्टाने निवडून आणले. मात्र त्यांनीही शिवसेनेशी गद्दारी केली असून माने घराण्याला शिवसैनिक अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत अशी खरमरीत टीका  केली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी धैर्यशील माने पंचगंगा नदीतील जलपर्णी हातात घेऊन नदी प्रदुषण विरोधी आंदोलनाचा आव आणत होते. खासदार झाल्यानंतर त्यांना नदी प्रदूषण दिसले नाही काय असा सवाल करत स्वार्थी राजकारण करणाऱ्या माने घराण्याला शिवसैनिक अद्दल घडविल्यशिवाय स्वस्त बसणार नाहीत असा इशारा अंधारे यांनी दिला.यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाळी, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, तालुका प्रमुख वैभव उगळे, यांची भाषणे झाली. यावेळी संपर्क प्रमुख मधुकर पाटील, शहर प्रमुख बाबासो सावगावे, राजू आवळे, आण्णासो बिल्लोरे, वैशाली जुगळे, संजय अनुसे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गद्दारांना खाली खेचासभेत सुषमा अंधारे यांनी, खासदार धैर्यशील माने यांच्याबरोबर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावरही सडकून टीका केली. त्या म्हणाल्या,  रत्नाप्पा कुंभार यांच्या आशिर्वादाने सहकार आणि राजकाणात येवून यड्रावकरांनी त्यांच्याशीच गद्दारी केली होती. तीच गद्दारी पुन्हा राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेशी  केली आहे. या गद्दारांना खाली खेचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSushma Andhareसुषमा अंधारेMuslimमुस्लीम