पोर्लेत सरपंच पदाची लाॅटरी कोणत्या गटाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:02+5:302021-02-05T07:00:02+5:30
जनसुराज्य पक्षाच्या झेंड्याखाली राजकीय इप्सित साध्य करणारे कासारी आणि उदय गट स्थानिक निवडणुकीत परस्पर विरोधी असतात. या दोन्ही गटांतून ...

पोर्लेत सरपंच पदाची लाॅटरी कोणत्या गटाला
जनसुराज्य पक्षाच्या झेंड्याखाली राजकीय इप्सित साध्य करणारे कासारी आणि उदय गट स्थानिक निवडणुकीत परस्पर विरोधी असतात. या दोन्ही गटांतून राजकीय मतभेदामुळे फुटलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना गटाने उदय गटाला हातमिळवणी करून कासारीकडील २५ वर्षांची सत्ता १३/५ च्या फरकाने काबीज केली.
सरपंच पदाचा ठोकताळा करून काही कार्यकर्त्यांनी निवडणूक ताकदीने लढवून जिंकली; परंतु निवडणूकीनंतर महिला आरक्षित सरपंच पदाच्या आरक्षणाने गट नेत्यांची डोकेदुखी वाढवली. आघाडीतून निवडून आलेल्या चार महिला सरपंच पदांच्या दावेदार आहेत. नशिबांनी सरपंच पदाच्या लाॅटरीचे तिकीट फाटले असले तरी पहिल्या बहुमानासाठी महिला सदस्यांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. चार सदस्यांपैकी दोन उदय, तर दोन राष्ट्रवादी, सेना गटाच्या असल्या तरी एकेकाळी उदयचा हा बुरूज होता. पाच वर्षांसाठी सरपंच, उपसरपंच पदाचा फाॅर्म्युला ठरवताना गटनेत्यांचा कस लागणार आहे. पंचवीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून पाच वर्षांसाठी दिलेल्या सत्तेचा खेळ होऊ नये, याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
चौकट
निवडून आलेल्या चार महिलांपैकी दोन महिला या उदय गटातून फुटून गेल्या. त्या राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत, तर दोन महिला या उदय गटातून निवडून आल्या आहेत. यापैकी उदय गटात नाराजीच्या वाटेवर असलेल्या गटाची त्या महिलेला उमेदवारी मिळाली होती. तसेच तंटामुक्त पद पराजितांना की डावलेल्यांना कार्यकर्त्याला द्यायचे हे कोडेचं आहे. सरपंच, उपसरपंच पद निवडीचे त्रांगडं पाच वर्ष सोडविताना गटनेत्यांचे नाकीनऊ होणार आहे.
Sent from my iPhone