हातकणंगले : हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुका पाच पक्ष लढवत आहेत, पण कोणालाही पॅनेल पूर्ण करता आले नाही, अशी कबुली वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.“सत्ता फक्त उपभोगण्यासाठी नसते, तर जनतेच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी सत्ता वापरावी लागते. “मी तीस वर्षे आमदार आणि बावीस वर्षे मंत्री आहे. गरिबांना मोफत उपचार उपलब्ध करून देणे, बांधकाम कामगारांना संरक्षण देणे या सगळ्या योजना शासनाच्या तिजोरीतून एकही रुपया न काढता निधी गोळा करून राबवू शकतो.यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब, नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक कुन्नुरे, शहराध्यक्ष अमित खोत, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष यासीन मुजावर, असगर मुजावर, हातकणंगले विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार उपस्थित होते.
Web Summary : Minister Hasan Mushrif admits difficulty finding candidates for Hatkanangale Nagar Panchayat elections. He emphasizes using power to solve public issues and highlights his work providing free treatment and worker protection without government funds.
Web Summary : मंत्री हसन मुश्रीफ ने हातकणंगले नगर पंचायत चुनाव के लिए उम्मीदवारों को खोजने में कठिनाई स्वीकार की। उन्होंने सार्वजनिक मुद्दों को हल करने के लिए सत्ता का उपयोग करने पर जोर दिया और बिना सरकारी धन के मुफ्त इलाज और श्रमिक सुरक्षा प्रदान करने के अपने काम पर प्रकाश डाला।