शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई विकास आराखड्यात मंदिर जतन संवर्धन कुठे आहे ?, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:46 IST

सुधारणा करून आराखडा सादर करण्याची सूचना

कोल्हापूर : अंबाबाई विकास आराखड्यात फक्त बाह्य सुधारणांना महत्त्व दिले गेले आहे. मंदिराचे मूळ दगडी बांधकाम, त्यावरील शिल्पांची झालेली दुरवस्था, पावसाळ्यातील मंदिर गळती, सुटलेल्या शिळा, दगडांची अडत यापैकी कशाचाच विचार केलेला दिसत नाही. सर्वात आधी मूळ मंदिराच्या जतन संवर्धनाला प्राधान्य देऊन त्याचा समावेश आराखड्यात करा. या सुधारणेनंतरच आराखडा शिखर समितीकडे सादर करा, अशी सूचना सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अंबाबाई, जोतिबा विकास आराखड्याच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अमल महाडिक, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नियोजन अधिकारी विजय भोपळे, देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, विजय जाधव, महेश जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मिसाळ म्हणाल्या, आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मंदिराच्या संवर्धनाच्या कामांचा समावेश करा. मंदिरावर ६४ योगिनी आणि अन्य शिल्पे असून, त्यातील काही शिल्पे फुटलेली आहेत. या सुधारणांसाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी लागेल. त्याचा प्रस्ताव करून तो पुरातत्व विभागाला पाठवावा. त्यांचे तज्ज्ञ बोलावून त्यांच्या माध्यमातून मंदिराची पाहणी करा. त्यांना आपले अभियंते द्या. मंदिराचा दुसरा टप्पा हा मंदिराच्या आवारातील वास्तूंच्या संवर्धनाचा असला पाहिजे.आमदार अमल महाडिक यांनी मंदिर बाह्य परिसरात अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली, तर जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठी निधी देता येईल, असे सांगितले.

शासकीय जागांचा विचार कराअंबाबाई आराखड्यासाठी भूसंपादन करताना कपिलतीर्थ मार्केट, पागा इमारत, शेतकरी संघ, विद्यापीठ हायस्कूल यासह शासकीय जागा संपादन करून तेथे सुविधा उपलब्ध करून देता येतात याचा विचार करायचे मंत्री मिसाळ यांनी सुचवले.

जोतिबावर वृक्षारोपण कराजोतिबा आराखड्याबाबत मिसाळ म्हणाल्या, जोतिबा परिसर प्लास्टिकमुक्त करा. डोंगरावर अधिकाधिक वृक्षारोपण करा. नारळ फोडण्यासाठी, अगरबत्ती कापूर लावण्याची जागा याचेही नियोजन आराखड्यात करा. स्वच्छतागृहांची संख्या वाढवा, फूड प्लाझा बनवा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर