शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

ताप आलाय तर जायचे कुठे?, रुग्णांची फरफट : डॉक्टरांकडून तपासणीसाठी टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 11:32 IST

अंगात थोडीशी कणकण आहे, सर्दी झाली आहे म्हणून दवाखान्यात जायचे म्हटले तर डॉक्टर पाल झटकल्यासारखे रुग्णाला हाकलून लावत आहेत. प्राथमिक टप्प्यातील उपचार होत नसल्याने ताप वाढत जाऊन रुग्णांचे कोरोना आणि मृत्यूपर्यंतच्या प्रवासातील अंतर कमी होत चालले आहे.

ठळक मुद्देताप आलाय तर जायचे कुठे?, रुग्णांची फरफट डॉक्टरांकडून तपासणीसाठी टाळाटाळ

कोल्हापूर : अंगात थोडीशी कणकण आहे, सर्दी झाली आहे म्हणून दवाखान्यात जायचे म्हटले तर डॉक्टर पाल झटकल्यासारखे रुग्णाला हाकलून लावत आहेत. प्राथमिक टप्प्यातील उपचार होत नसल्याने ताप वाढत जाऊन रुग्णांचे कोरोना आणि मृत्यूपर्यंतच्या प्रवासातील अंतर कमी होत चालले आहे.कोल्हापुरात कोरोनाने हैदोस घातला आहे. रोज शेकडोंनी रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत. ताप येणे हे कोरोनाचे प्राथमिक लक्षण असले तरी तेच एकमेव आहे असेही नाही; पण सध्या आला ताप की लगेच कोविड रुग्णालयाकडे पाठवण्याचा धडाकाच डॉक्टरांनी लावला आहे. त्यामुळे ताप आलेले रुग्ण म्हणजे कोरोनाबाधितच आहेत अशीच त्यांच्याशी वर्तणूक केली जात आहे.किरकोळ ताप आला तर अँटीबायोटिक गोळ्या घेऊन दोन-तीन दिवसांत बरे होता येते, पण रुग्ण आला तर डॉक्टर त्यांना तपासण्याचीही तसदी घेत नाहीत; त्यामुळे ताप अंगावर काढण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही खूप त्रास होतोय म्हणून गेल्यावर थेट सरकारी रुग्णालयात स्राव तपासणीसाठी पाठवले जात आहे.तासाभरात होत्याचे नव्हतेअशीच एक घटना घडली आहे, सध्या कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक असलेल्या इचलकरंजी शहरात. एक धडधाकट महिला. जरासा ताप आला म्हणून दवाखान्यात गेली तर एकाही डॉक्टरने उपचार केले नाहीत. दोन दिवस असेच तापात गेले. अखेर तिसऱ्या दिवशी थेट आयजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले. सकाळी १० वाजता दवाखान्यात गेलेल्या या महिलेचा ११वाजता मृतदेहच बाहेर आणावा लागला. तासाभरात होत्याचे नव्हते झाले होते.

सर्दी, ताप औषध देऊन बरा होतो की नाही बघण्याऐवजी थेट कोविड सेंटरला भरती केले जात आहे. अगोदरच घाबरलेल्या पेशंटला धीर देण्याऐवजी थेट भीतीच्या वातावरणात ढकलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने थंडी-ताप असणाऱ्या रुग्णावर दिल्ली सरकारप्रमाणे प्रथम घरी प्रथमोपचार करावेत. जर उपचाराला प्रतिसाद देत नसेल, तरच कोविड सेंटरला नेऊन उपचार करावेत.- मोहन खोत, एक त्रस्त नागरिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरkolhapurकोल्हापूर