शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

नोटबंदीनंतर निवडणुकांसाठी भाजपाकडे पैसा आला कुठून? - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:38 IST

नोटाबंदीत जेवढे पैसे बंद झाले तेवढेच पुन्हा बँकेत आलेत मग नोटबंदी करून फायदा काय झाला? देशातला पहिला पंतप्रधान आहे जो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. देशातील लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही असा आरोप राज यांनी केला. 

इचलकरंजी - नोटबंदी करताना आरबीआयला माहित नाही. मंत्रिमंडळाला माहीत नाही. मंत्र्यांचे मोबाईल काढून घेतले. सर्वोनुमते निर्णय का घेतला गेला नाही? 14 लाख कोटी रुपये देशाच्या व्यवहारात चलनात होते. 500-800 कोटींच्या खोट्या नोटा असताना 14 लाख कोटी नोटाबंदी केली गेली. 2014 पासून आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाकडे पैसा आला कुठून? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपाला केला आहे. सोलापूरनंतर राज ठाकरे यांनी इचलकरंजीमध्ये सभा घेतली त्यामध्ये ते बोलत होते. 

यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले की, काळा पैसा आणायचा आहे तर तुमच्या ईडी, आयकर विभाग यापासून सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असताना काळा पैसा कुणाकडे आहे याची माहिती सरकारला नाही का? नोटबंदीचा उद्देश स्वच्छ नव्हता. नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांचे रोजगार गेले, यंत्रमाग कामगार उधवस्त झाले. नोकऱ्या कुठे शोधायच्या? नोटबंदी, जीएसटी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. जाहिरातींवर साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले गेले. नोटाबंदीत जेवढे पैसे बंद झाले तेवढेच पुन्हा बँकेत आलेत मग नोटबंदी करून फायदा काय झाला? देशातला पहिला पंतप्रधान आहे जो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. देशातील लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही असा आरोप राज यांनी केला. 

माझा उमेदवार निवडणुकीत उभे नसले तरी भाजपावाले फडफडतायेत, आम्ही सभा घेतोय तर खर्च आमच्यात खात्यात मोजणार असं सांगत मी जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाही असा आरोप करत राज यांनी मी जे करतोय ते देशाच्या भविष्यासाठी चांगलंच आहे. कारण यापुढे देशातला कोणताही राजकारणी तुमच्यासमोर उभं राहिला तेव्हा तो खोटा बोलणार नाही, खोटं बोलून मतं मागणार नाही असा दावा राज ठाकरेंनी जनतेसमोर केला. 

मेक इन इंडिया महाराष्टाला शिकवू नयेइचलकरंजी येथे 1904 साली यंत्रमाग सुरु झालं. महात्मा गांधी यांनी सुत काढण्याआधीच इचलकरंजी शहराने सुत काढायला सुरुवात केली होती हा या शहराचा इतिहास आहे. नॅनो गाडी रतन टाटा यांनी काढली मात्र त्याआधी 1970 साली इचलकरंजीतल्या माणसाने मिरा नावाची सर्वात छोटी गाडी काढली. इथे हरहुन्नरी लोकं असताना त्यांना मेक इन इंडिया शिकवता? महाराष्ट्र नेहमीच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवले. आजही देशात औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच आहे. त्यामुळे मेक इन इंडिया महाराष्ट्राला शिकवू नये असा टोला राज यांनी लगावला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी