शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘कृषिबंध’चे पैसे गेले कुठे ? : गुंतवणूकदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:59 IST

गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार संचालकांचे उंबरे झिजवत आहेत. या तक्रारी थेट पोलिसांपर्यत गेल्या आणि कारवाईची टांगती तलवार समोर असतानाही पैसे परत करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे

ठळक मुद्देकारवाईची भीती असूनही हालचाल नाहीच

दत्ता पाटील।म्हाकवे : कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र, गुंतवणूकदारांना ते परत न केल्याप्रकरणी जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असणारे म्हाकवे (ता. कागल) येथील बंडोपंत ऊर्फ बी. के. पाटील यांच्यासह संचालक के. के. कुंभार (आणूर) यांना अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार संचालकांचे उंबरे झिजवत आहेत. या तक्रारी थेट पोलिसांपर्यत गेल्या आणि कारवाईची टांगती तलवार समोर असतानाही पैसे परत करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे इतकी रक्कम गेली तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.

सध्या कंपनीच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही की रोख रक्कम शिल्लक नाही. तरीही पै-पै जमा करून गुंतवणूक केलेल्या हजारो गुंतवणूकदारंचे अद्याप कोट्यवधी रुपये या कंपनीकडे अडकले आहेत. असे असतानाही जबाबदार संचालक मंडळ एकत्रित येऊन रकमेची जबाबदारी न स्वीकारता एकमेकांकडे बोट दाखविण्यातच धन्यता मानत होते. कंपनी फायद्यात आली असती तर वाट्यासाठी मारामारी झाली असती. मग, तोट्याच्यावेळी काढता पाय का? असा सवाल गुंतवणूकदारांतून होत आहे.

कोल्हापूरसह सीमाभागातील हजारो गुंतवणूकदारांनी जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडून कृषिबंध अ‍ॅग्रो कंपनीत कोट्यवधीची गुंतवणूक केल्याचे समजते. या कंपनीचे पहिले अध्यक्ष बंडोपंत पाटील-म्हाकवेकर यांनी २०१६ मध्ये राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी झटकली होती. तर विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव-सोनगेकर हे सध्या अर्धांगवायूने आजारी आहेत. त्यांच्या पत्नी नंदा जाधव या कार्यकारी संचालिका होत्या.

या कंपनीच्या राजारामपुरी (कोल्हापूर), म्हाकवे, हमिदवाडा येथील कार्यालयांना कुलुपे आहेत. त्यामुळे स्वकमाईतील रक्कम या कंपनीत गुंतविलेले हवालदिल झाले होते. दरम्यान, ताराराणी आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाचे भिंग फुटले होते. पुणे, राधानगरी, भुदरगड चिक्कोडी परिसरात जागा, जमीन घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, एकही व्यवहार रितसर झालेला नसल्याचे समजते.बी. के. हिरो ते झिरो...घरात राजकीय पार्श्वभूमी नसतानाही बी. के. पाटील यांना बाजार समितीचे दहा वर्षे संचालक पद, त्यामध्ये पाच वर्षे सभापती पद, तसेच गोकुळ, बिद्री कारखान्यांतही संचालक केले. मात्र, त्यांनी २००७च्या दरम्यान राजकीय गट बदलून बिद्रीला पुन्हा संचालक होण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी लागली. त्यांना दोन्हींकडूनही पद मिळाले नाही. त्यामुळे दोन वर्षे ते राजकारणापासून अलिप्तच होते. त्यांनी बालाजी लकी ड्रॉ काढला. यामध्ये त्यांनी प्रचंड विश्वासार्हता संपादन केली. मात्र, कृषिबंधचे घोडे कुठे आडले कोण जाणे. राजकारणातील अत्यंत चतुर आणि धुरंधर असणारे पाटील हे यामध्ये गुरफटले गेले. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.संचालकांनी भान ठेवलेच नाही

  • एजंटाना अमाप कमिशनबरोबरच कंपनी चालकांनी अलिशान गाड्या घेतल्याची चर्चा आहे. आलिशान हॉटेलमध्ये बैठका, सभा मंडपासाठी वारेमाप खर्च आणि ऐशोआरामी केल्याची चर्चा आहे.
  • गुंतवणूकदारांची रक्कम परत करायची असते. याचे भानच त्यांनी ठेवले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पै-पै जमा करून या कंपनीत गुंतवलेले पैसे वायाच जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी