शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दाजीपूर अभयारण्याचा दर्जा सुधारणार कधी? राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य

By संदीप आडनाईक | Updated: September 21, 2022 18:02 IST

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले.

संदीप आडनाईककोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले. राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य म्हणून ख्याती लाभलेल्या या अभयारण्याचा पुढे १९८५ मध्ये विस्तार करून राधानगरी वन्यजीव या अभयारण्याची निर्मिती झाली. पण आज या अभयारण्याचा दर्जा उंचाविण्यासाठी नि:स्वार्थी, प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. तसेच संशोधनात्मक अभ्यासालाही प्राधान्य द्यायला हवे.त्याचबरोबर पन्हाळा, गगनबावडा आणि शाहूवाडी परिसरात असलेल्या वन्यजीव आणि संपदेला अभय मिळण्यासाठी आणखी एका अभयारण्याची आवश्यकता आहे.सन १९९६ ते १९९८ या काळात अभयारण्यातील कोअर झोनमध्ये असणाऱ्या इदरगंज परिसरातील ८८८ हेक्टर पठारावर इंडाल या बहुराष्ट्रीय कंपनीने बॉक्साईट खाणकाम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. पण पर्यावरणप्रेमी संघटनांनी प्रखर विरोध करून व न्यायालयीन लढे देऊन हे खाणकाम प्रकल्प बंद पाडले होते. यामुळे अभयारण्याचे अस्तित्व टिकून राहिले.

जागतिक वारसास्थळाचा दर्जा (२०१२)वनविभागाने २००९ मध्ये कोल्हापुरातील वनस्पतितज्ज्ञ, प्राणितज्ज्ञ व पर्यावरणतज्ज्ञ यांच्या सहकार्याने अभयारण्याच्या जैवविविधतेबाबत सविस्तर सचित्र अहवाल तयार करून घेऊन अभयारण्यास जागतिक वारसास्थळ हा दर्जा प्राप्त होण्याबाबतचा प्रस्ताव अहवालासहित युनेस्कोस सादर केला. २०१२ मध्ये याला मंजुरी मिळाली आणि राधानगरी अभयारण्यास युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळ हा दर्जा मिळाला. यामुळे याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळाला.

रहिवाशी, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ३५ वर्षांनंतरही कायम

अभयारण्यातील वन्यजिवांच्या विकासासाठी, माणसांचा हस्तक्षेप व अतिक्रमण टाळण्यासाठी नियमाप्रमाणे येथील मानवी वस्त्या, गावे आणि रहिवाशी, ग्रामस्थांचे पुनर्वसन होणे गरजेचे असते. पण अस्तित्वात येऊन ३५ वर्षे होऊनही हे झाले नाही. शासन व अभयारण्यग्रस्तांमध्ये तीव्र वैचारिक मतभेद आहेत. आवश्यक निधी नसल्याने पुनर्वसन प्रक्रिया रखडलेली आहे. -डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ. 

राधानगरी वन्यजीव अभयारण्य

  • राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांचे पाणलोट क्षेत्राचा अभयारण्यात समावेश
  • एकूण क्षेत्रफळ ३५१.१६ चौ. कि. मी.
  • राधानगरी २८ आणि गगनबावडा तालुक्यातील एक अशा एकूण २९ गावांचा समावेश
  • ५०० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती
  • सस्तन प्राण्यांच्या ४७, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ५९, उभयचरांच्या २०, पक्ष्यांच्या ६४, फुलपाखरांच्या ६६ प्रजातींची नोंद
  • गवे, वाघ, बिबटे, भेकर, पिसोरी, सांबर, रानकुत्रे, शेकरू अशा वन्यप्राण्यांचा समावेश.
  • प्राणिगणनेतून गव्यांची नोंद : ६१० (२००४), १०९१ (२०१४).
  • वाघाचे पाणी, कोकण दर्शन, सावराई सडा, पाटाचा डंग, सांबरकोंड, काळा डंग, इदरगंज सडा, उगवाई अशी ठिकाणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीforestजंगल