करवीरला तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन इमारती मिळणार कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:03+5:302021-01-09T04:21:03+5:30

कोपार्डे : करवीर तालुक्यातून प्रशासकीय कामासाठी करवीर तहसीलदार कार्यालय व करवीर पोलीस ठाण्यात हजारो लोक दररोज येत असतात; पण ...

When will Karveer get tehsildar office, police station buildings? | करवीरला तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन इमारती मिळणार कधी

करवीरला तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन इमारती मिळणार कधी

googlenewsNext

कोपार्डे : करवीर तालुक्यातून प्रशासकीय कामासाठी करवीर तहसीलदार कार्यालय व करवीर पोलीस ठाण्यात हजारो लोक दररोज येत असतात; पण कार्यालयात आल्यानंतर बसण्यासाठी वेटिंग रुम नाही की पिण्याच्या पाण्याची सोय नाही. यामुळे कामासाठी येणाऱ्या लोकांची ही कार्यालये म्हणजे कोंडवाडा असल्याचे चित्र आहे. सर्वाधिक महसूल देणाऱ्या करवीरच्या या कार्यालयांना इमारती मिळणार कधी

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत मोठा तालुका म्हणून करवीर तालुका ओळखला जातो. या तालुक्याची विभागणी शहर व ग्रामीण अशी होते. पण महसुली कामासाठी करवीर तहसीलदार तर रेशनकार्डसाठी पुरवठा कार्यालयात यावेच लागते तर करवीर पोलीस ठाण्यात ११८ गावे व २२ वाड्यांवस्त्यांतील जनतेला यावे लागते. या तिन्ही कार्यालये संस्थानकालीन इमारतीत आहेत. येथे दररोज तालुक्यातून हजारो लोकांची वर्दळ असते. मात्र, मुलभूत सुविधांची वानवा जाणवत असून याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशा प्रतिक्रिया येत आहेत.

करवीर पोलीस ठाण्याची अवस्था तिच आहे. गुन्हेगारांना पोलीस कोठडी नसल्याने गांधीनगर पोलीस ठाण्यात घेऊन जावे लागते. सुरक्षित स्टोअर रूम नसल्याने जप्त केलेल्या वस्तू ठेवताना असुरक्षितता आहे. पोलीस ठाण्यात दोन माणसे जरी आली तरी बसण्याची व्यवस्था नसल्याने सर्वांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण होते. येथील कर्मचाऱ्यांना बैठक व्यवस्था ही तुटपुंजी असल्याने विशेषतः महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा तर होतेच पण विभागवार अशी बैठक व्यवस्थाच नाही. यामुळे वरिष्ठांना कामकाजावर व्यक्तिगत लक्ष देताना अडचणी आहेत.

प्रतिक्रिया

राजेंद्र सूर्यवंशी (पंचायत समिती माजी सभापती व सदस्य) --तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरावस्था आहे. जनतेला मूलभूत सुविधा नाहीत. मौल्यवान दस्तऐवज असुरक्षित आहेत. ग्रामीण भागातील जनतेसाठी सेवा चांगली मिळावी व प्रशस्त इमारतीसाठी पाठपुरावा करणार आहे.

चौकट

फोटो

करवीर तहसीलदार व पोलीस ठाण्याची जीर्ण इमारत व

जनतेला बसण्यासाठी बैठक व्यवस्था नसल्याने चौकात असणाऱ्या चिंचेच्या झाडाच्या कठड्यावर बसण्याची वेळ येत आहे.

Web Title: When will Karveer get tehsildar office, police station buildings?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.