शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

हातकणंगले तालुक्याच्या विभाजनास मुहूर्त कधी ?

By admin | Updated: November 4, 2014 00:24 IST

नव्या सरकारकडून अपेक्षा : प्रशासकीय इमारत कागदावरच, तालुका क्रीडा संकुलाचे कामही रेंगाळले

दत्ता बीडकर - हातकणंगले  पारगाव-नीलेवाडीपासून कर्नाटक राज्याच्या हद्दीपर्यंत विस्तारलेला अडीच ब्लॉकचा तालुका विभाजन करून दोन किंवा तीन तालुके करण्याची २००१ पासूनची मागणी ऐरणीवर आहे. सात लाख दहा हजारांवर लोकसंख्या पोहोचलेला जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे. दरडोई उत्पन्नामध्येही राज्यात अव्वल असताना विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुक्याला सेवा-सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. कोल्हापूर-सांगली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणामध्ये जमीन आणि घरे गमावलेल्या विस्थापितांना गेली दोन वर्षे नुकसानभरपाई मिळालेली नाही. अनेक गावांतील जमिनीचा कब्जाच ठेकेदार कंपनीला दिला नाही. यामुळे दोन वर्षांची मुदत संपूनही चाळीस टक्के रस्ता पूर्ण नाही. साडेचार कोटींच्या प्रशासकीय इमारतीला गेले एक वर्षे निधीची दमडीही मिळाली नसल्यामुळे काम ठप्प आहे. तालुक्याच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्यामुळेच प्रश्नांची तड लावणार कोण? हे न सुटणारे कोडे आहे.हातकणंगले तालुका सहकार, औद्योगिक, कृषी यासह इतर क्षेत्रांत प्रगतीपथावर आहे. शहरीकरण आणि वाढती स्पर्धा यामुळे तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. इतर राज्यांबरोबरच जिल्ह्यातील इतर तालुक्यांतून, जिल्ह्यांतून या तालुक्याकडे दरवर्षी लोकांचा ओघ वाढतोच आहे. इचलकरंजीतील यंत्रमाग, सायझिंग व्यवसाय, जवाहर, पंचगंगा, शरद साखर कारखान्यांकडील वाढता कामगार वर्ग, त्यांच्या जोडीला असलेल्या सहकारातील सूतगिरण्या, शिरोली औद्योगिक वसाहत, लक्ष्मी औद्योगिक वसाहत आणि हुपरी यळगूड पंचतारांकित वसाहत ही या वाढत्या लोकसंख्येला कारणीभूत आहेत. तालुक्याची लोकसंख्या आज गणिताच्या पलीकडे गेली आहे. अडीच ब्लॉकचा एकच तालुका असल्यामुळे सेवा-सुविधांचा पुरवठा करताना तालुक्यातील प्रशासनाची दमछाक होत आहे. म्हणूनच २००१ पासून वडगाव, हातकणंगले आणि हुपरी किंवा इचलकरंजी असे तीन तालुके करावेत, अशी ज्या-त्या विभागाची मागणी आहे. मात्र, प्रशासनाकडून हातकणंगले, इचलकरंजी असे दोन तालुके होण्यासाठी आपली यंत्रणा चारपाच वर्षे हलवूनही याला यश आले नसल्यामुळे तालुका विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यातील संपूर्ण शासकीय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी दोन वर्षांपूर्वी साडेचार कोटींची प्रशासकीय इमारत मंजूर केली. मात्र, गेल्या एक वर्षात एक रुपयाही या इमारतीसाठी शासनाकडून मिळाला नसल्यामुळे प्रशासकीय इमारतीचे काम रखडले आहे. तालुका क्रीडा संकुलाचा विषय २००५ पासून प्रलंबित आहे. संकुलासाठी २५ लाख रुपये निधी भारतीय स्टेट बॅँकेच्या शाखेत पडून आहे. मात्र, क्रीडा संकुलाची तड लावण्यास कोणीही पुढे यायला तयार नाही. हातकणंगले ग्रामपंचायतीने २००१ मध्ये जमीन दिलेली असताना या जागेवर क्रीडा संकुल होत नाही. पर्यटनाला चालना हवीतीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि ‘क’ वर्ग पर्यटन स्थळे विकास कार्यक्रम रामलिंग, अलमप्रभू, धुळोबा, रेणुका मंदिर (आळते), बिरदेव मंदिर (पट्टणकोडोली), नागनाथ मंदिर (नरंदे) यांसह इतर धार्मिक ठिकाणी राबवून पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे.पर्यायी मार्गाची गरजकोल्हापूर-सांगली राज्यमार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रुकडी-गांधीनगर दरम्यान पंचगंगा नदीवर पूल उभारून इचलकरंजीसह कुरुंदवाड पर्यटनाच्या वाहनधारकांसाठी पर्यायी मार्गाची सोय करणे गरजेचे आहे.नगरपरिषदांची मागणीदहा हजारांवरील लोकसंख्या असलेल्या कबनूर, हुपरी, शिरोली, रेंदाळ, पट्टणकोडोली, कोरोची, हातकणंगले, कुंभोज, रुकडी या गावात नगरपंचायती / नगरपरिषदेची मागणी होऊनही ती पूर्ण केली जात नाही. जिल्हा प्रशासनाकडून वरील गावे शहरीकरणाचा भाग बनली असल्याचा अहवाल नगरविकास विभागाकडे पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्याच्या, गावाच्या ग्रामपंचायती नगरपरिषदा करण्याचा निर्णय होऊनही हातकणंगले ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदांमध्ये झालेले नाही.कोल्हापूर-सांगली राज्य मार्गाचे खासगीकरणातून चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला. आॅक्टोबर २०१२ मध्ये कामाला सुरुवात झाली. रस्त्यांमध्ये व जमिनी जाणाऱ्या शेतकरी व मिळकतधारक विस्थापितांना दोन वर्षे झाली, तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. हेर्ले, अतिग्रे, हातकणंगले या ठिकाणच्या जमिनीचा कब्जाच प्रशासनाकडून अद्याप ठेकेदार कंपनीला दिला नसल्यामुळे गेली दोन वषे फक्त ४० टक्के काम पूर्ण झाले. आॅक्टोबर २०१४ ला या कामाची मुदत संपूनही रस्ता पूर्ण नाही.बाजारांचे नियोजन नाहीमोठ्या लोकवस्तीबरोबर लहान-लहान गावांमध्येही आठवडा बाजाराचे नियोजन झाले नाही. यामुळे ग्रामीण भागातील बाजारासाठीचा ओढा शहराकडे जाणारा थांबला आहे. अशा आठवडा बाजारासाठी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून योग्य पावले उचलण्याची गरज आहे.हातकणंगले तालुका