शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट कधी?, मालवण घटनेनंतर समोर आला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:53 IST

कोल्हापूर : मालवण समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळे तसेच चबुतरे यांच्या स्थिरतेचा (स्टॅबिलिटी) तसेच ...

कोल्हापूर : मालवण समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळे तसेच चबुतरे यांच्या स्थिरतेचा (स्टॅबिलिटी) तसेच संरचनात्मक लेखापरीक्षणाचा (स्ट्रक्चरल ऑडिट) विषय चर्चेत आला असून कोल्हापूर शहर परिसरातील महापुरुषांचे जे पुतळे उभा करण्यात आले आहेत, त्यांच्या तपासणी कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कोल्हापूर शहरात अनेक महापुरुषांचे पुतळे उभे करण्यात आले आहेत. त्याला आता पंचवीस वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. शहरातील कावळा नाका चौकातील छत्रपती ताराराणी यांचा दोन पायांवर उभा असलेला अश्वारूढ, शिवाजी विद्यापीठ आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीन पायांवर उभा असलेला अश्वारूढ, वरुणतीर्थवेश गांधी मैदानावर उभारण्यात आलेला महात्मा गांधींचा पुतळा,दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, व्हीनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, महापालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील भाऊराव पाटील तसेच राजीव गांधी यांचा पुतळा, मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा असे महापुरुषांचे भव्य व मोठे पुतळे कोल्हापूर शहरात आहेत.

कोणाचेच गांभीर्याने लक्ष नाही

  • कोल्हापुरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी ज्या-त्या वेळी पुतळा समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून पुतळे उभे करण्यात आले. त्यानंतर ते महापालिकेकडे वर्ग झाले. महापालिका प्रशासनाकडून आठवड्यातून एक-दोनवेळा या सर्व पुतळ्यांची स्वच्छता केली जाते, तसेच जयंती, पुण्यतिथी दिवशी पूजन केले जाते; परंतु या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा कधी प्रश्न उद्भवला नाही.
  • त्यामुळे महापालिकेसह कोणाचेच त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष गेलेले नाही; परंतु आता हे पुतळे उभे करून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्याकाळात उभे करण्यात आलेले चबुतरे किती मजबूत आहेत, याची एकदा तपासणी करण्याची आवश्यकता मालवण दुर्घटनेनंतर वाटत आहे.
  • महापालिका प्रशासनाने आपल्या यंत्रणेमार्फत या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याची स्टॅबिलिटी, स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासली पाहिजे, अशी सूचना समोर आली आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर