शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस म्हणून घरात घुसून व्यापाऱ्यास दाखवला पिस्तुलाचा धाक, कोल्हापुरातील खबळजनक घटना

By उद्धव गोडसे | Updated: August 13, 2024 17:15 IST

पाऊण तास व्यापाऱ्याच्या घरात थरार

कोल्हापूर : पोलिस असल्याचे सांगत आलेल्या अज्ञाताने पिस्तुलाचा धाक दाखवत शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीतील व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे (वय ५६) आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावले. हा प्रकार सोमवारी (दि.१२) रात्री साडेनऊ ते सव्वादहाच्या दरम्यान घडला. नष्टे यांच्या घरात सुमारे पाऊण तास थरार सुरू होता. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मास्क परिधान केलेल्या अज्ञाताने थेट घरात घुसून पिस्तूल दाखवत दहशत माजवल्याने शाहूपुरीत खळबळ उडाली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी नष्टे हे शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीत कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अंदाजे सहा फूट उंचीचा, सुमारे ४० वर्षे वयाचा तरुण नष्टे यांच्या दारात आला. संदीप नष्टे यांचेच घर आहे काय? अशी विचारणा करून तो थेट घरात घुसला. त्याच्या अंगात लाल-निळ्या रंगाचा चौकड्याचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पँट होती. तोंडावर मास्क असल्याने त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता.पोलिस असल्याचे सांगत तो सोफ्यावर बसला. तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार आहे. तुम्ही तडजोड करून प्रकरण मिटवणार आहे, की वाढवणार आहे? अशी त्याने विचारणा केली. बराच वेळ यावरून नष्टे आणि संशयितामध्ये चर्चा सुरू होती. तक्रारीबद्दल सविस्तर माहिती आणि नाव विचारताच त्याने वाद घालायला सुरुवात केली. हा कोणीतरी भामटा असावा, अशा संशय बळवताच नष्टे कुटुंबीयांनी त्याला घरातून बाहेर जायला सांगितले.त्याचवेळी संशयिताने कमरेेचे पिस्तूल काढून संदीप नष्टे यांच्या दिशेने रोखून धरले. प्रकरण मिटवले नाही तर तुम्हाला जड जाईल. कोणालाही सोडणार नाही, असे म्हणत तो धमकावू लागला. पिस्तूल पाहताच नष्टे कुटुंबीयांची भीतीने गाळण उडाली. नष्टे यांचे आई, वडील, पत्नी आणि मुलांनी हॉलमध्ये धाव घेतली. गोंधळ वाढताच संशयिताने काढता पाय घेतला.

नेमके कारण काय?संशयिताने पोलिस ठाण्यातील तक्रारीचा उल्लेख करीत वारंवार तडजोड करण्याचा आग्रह धरला. कोणाचेही नाव न घेता तो केवळ तडजोड करा आणि प्रकरण मिटवा, असे म्हणत होता. हातात पिस्तूल असूनही त्याने कोणाला जखमी केले नाही. त्यामुळे संशयिताचा उद्देश केवळ पैसे काढण्याचा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस